परभणीत साडेचार लाख हेक्टरवर पिके वाया

परभणीत साडेचार लाख हेक्टरवर पिके वाया
परभणीत साडेचार लाख हेक्टरवर पिके वाया

परभणी : ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ४ लाख ६३ हजार ३७१ शेतकऱ्यांच्या जिरायती, बागायती आणि फळपिकांचे एकूण ४ लाख ५६ हजार ९३३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ३१२ कोटी ४४ लाख ४५ हजार रुपये एवढ्या निधीची मागणी केली आहे.

जिल्ह्यात यंदा खरिपात ५ लाख ५६ हजार ३० हेक्टरवर पेरणी झाली. मात्र पावसामुळे सोयाबीन, कापूस, तूर, ज्वारी, आदी जिरायती पिकांसह कांदा, मिरची आदी भाजीपाला पिके, केळी, पपई आदी बागायती पिके, संत्रा, मोसंबी, डाळिंब, आंबा, चिकू, द्राक्ष आदी फळपिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे सर्वेक्षणातून आढळून आले.

नुकसानग्रस्त पिकांमध्ये ४ लाख ५८ हजार ६२१ शेतकऱ्यांची ४ लाख ५४ हजार ६९८ हेक्टरवरील जिरायती पिके, ४ हजार १० शेतकऱ्यांची १ हजार ७१९ हेक्टरवरील बागायती पिके, ७४० शेतकऱ्यांची ५१५ हेक्टरवरील बहुवार्षिक फळपिकांचा समावेश आहे. एनडीआरएफच्या निकषाच्या आधारे दोन हेक्टरच्या मर्यादेत बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी जिरायती पिकांसाठी ३०९ कोटी १९ लाख ४९ हजार रुपये, बागायती पिकांसाठी २ कोटी ३२ लाख १३ हजार रुपये, बहुवार्षिक फळपिकांसाठी ९२ लाख ८३ हजार रुपये असे एकूण ३१२ कोटी ४४ लाख ४५ हजार रुपये एवढ्या निधीची मागणी जिल्हा प्रशासनातर्फे विभागीय आयुक्तांकडे केली.

बाधित शेतकरी संख्या, नुकसान क्षेत्र (हेक्टरमध्ये)

तालुका शेतकरी संख्या नुकसान क्षेत्र
परभणी ८२२०९  ८०५५०
जिंतूर ६८१९८ ७३३९१
सेलू ५११६३ ५१२१३
मानवत ३५६५५ ३७४३८
पाथरी ४००२८  ४२९६३
सोनपेठ ३०९७४  २७८७७
गंगाखेड ५६०८२  ४९९७५
पालम ४२८०१  ४२१९०
पूर्णा ५६२६१ ५१३३२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com