साताऱ्यात लोकसभा, विधानसभेची एकाच वेळी मतमोजणी

साताऱ्यात लोकसभा, विधानसभेची एकाच वेळी मतमोजणी
साताऱ्यात लोकसभा, विधानसभेची एकाच वेळी मतमोजणी

सातारा : लोकसभेसोबत विधानसभेच्या सहा मतदारसंघांची एकाच वेळी मतमोजणी सुरू होणार असून, सकाळी आठ वाजता मोजणीस सुरवात होणार आहे. 

पहिल्यांदा पोस्टल मते मोजल्यानंतर साडेआठ वाजता प्रत्यक्ष मतमोजणी सुरू होईल. नऊ वाजता सहा मतदारसंघांसह लोकसभेच्या पहिल्या फेरीचा निकाल हाती येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी दिली. सर्वाधिक ३३ फेऱ्या या पाटण विधानसभेच्या असल्याने अंतिम निकाल हाती येण्यास १२ तास लागणार आहेत. 

आठ विधानसभा मतदारसंघांपैकी फलटण आणि माणची मतमोजणी त्या मतदारसंघांत, तर सातारा लोकसभा व सहा विधानसभा मतदारसंघांची मोजणी साताऱ्यातील वखार महामंडळाच्या गोदामात होईल. सकाळी ८ वाजता प्रथम पोस्टल, तर साडेआठ वाजता प्रत्यक्ष मोजणी सुरू होईल. एका फेरीला साधारण २० मिनिटे असा वेळ धरल्यास नऊपर्यंत पहिल्या फेरीचा निकाल समजेल. 

हॉलमध्ये विधानसभेची आणि लोकसभेची विधानसभा मतदारसंघनिहाय मोजणी एकाच वेळी होईल. सफेद कापड असलेल्या टेबलांवर लोकसभेची तर लाल कापड असलेल्या टेबलावर विधानसभेची मोजणी होईल. सातारा लोकसभेसाठी १४ टेबल, विधानसभेसाठी १४, तसेच पाटणला १२, वाई १४, कोरेगाव ११, कऱ्हाड उत्तर ११, कऱ्हाड दक्षिण २० टेबलवर मोजणी होईल. 

मतमोजणीच्या फेऱ्यांमध्ये सातारा ३१, कोरेगाव ३२, वाई ३२, कऱ्हाड उत्तर ३१, कऱ्हाड दक्षिण ३०, पाटणसाठी ३३ फेऱ्या होतील. किमान एक फेरी मोजण्यासाठी २० ते २५ मिनिटे लागतील. संपूर्ण मोजणीस ११ आणि एक तास व्हीव्हीपॅटची तपासणी याप्रमाणे १२ तास मतमोजणी चालेल. सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत मोजणी चालेल आणि अंतिम निकाल देण्यास रात्री १० वाजणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com