पारनेर कारखाना विक्रीतील  दोषींवर कारवाईची मागणी 

नगर जिल्ह्यातील पारनेर सहकारी साखर कारखान्याच्या विक्री प्रक्रियेत झालेल्या घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी कारखाना बचाव समितीने सक्तवसुली संचालनालयाकडे (ईडी) केली आहे.
पारनेर कारखाना विक्रीतील  दोषींवर कारवाईची मागणी  Parner factory sale Demand for action against the culprits
पारनेर कारखाना विक्रीतील  दोषींवर कारवाईची मागणी  Parner factory sale Demand for action against the culprits

नगर : नगर जिल्ह्यातील पारनेर सहकारी साखर कारखान्याच्या विक्री प्रक्रियेत झालेल्या घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी कारखाना बचाव समितीने सक्तवसुली संचालनालयाकडे (ईडी) केली आहे. पारनेर साखर कारखाना बचाव समितीच्या प्रतिनिधी रामदास घावटे, बबनराव कवाद यांनी दिल्ली येथे केंद्रीय अर्थमंत्री डॉ. भागवत कराड व ईडीचे मुख्य संचालक संजय मिश्रा यांची दिल्ली येथे भेट घेऊन कारवाईची मागणी केली आहे. पारनेर कारखाना विक्रीनंतर लगेचच यातील गैरव्यवहाराची तक्रार करण्यात आली होती. पुढे या विषयी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. ऑगस्ट २०१९मध्ये उच्च न्यायालयाने ईडीला कारवाईचे आदेश दिले होते. परंतु ईडीच्या मुंबई झोन कार्यालयाने या बाबत कोणतीच कारवाई केली नाही. न्यायालयाच्या आदेशानंतरही कारवाई केली जात नसल्यामुळे कारखाना बचाव समितीने ईडीच्या मुंबई झोन अधिकाऱ्यांची तक्रार दिल्लीतील मुख्य संचालक व अर्थमंत्री यांच्याकडे केली आहे.  पारनेर सहकारी साखर कारखाना विक्रीतील भ्रष्टाचार प्रकरणी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात एकूण तीन याचिका दाखल असून, त्यांचे निकाल प्रलंबित आहेत. कारखाना विक्री व्यवहारात मोठ्या प्रमाणात काळा पैसा वापरला असल्याचा संशय आहे .कारखाना विकत घेणारी खासगी कंपनी क्रांती शुगर यांच्याकडे कोणतीही मालमत्ता व भांडवल नसताना सुमारे ३२ कोटी रुपयांना हा कारखाना विकत घेतला होता.  राज्य सहकारी बँकेने पारनेर कारखाना विक्रीची बोगस प्रक्रिया राबवली होती. कारखाना घेण्यासाठी वापरलेला पैसा काळा पैसा असावा, असा संशय आहे. हा व्यवहार पूर्ण करण्यासाठी एका बड्या राजकीय नेत्याने पैसा पुरवला असल्याची माहिती ईडीला देण्यात आली आहे. आता त्या बाबत ईडी चौकशी करणार आहे. या विक्री गैरव्यवहारात राज्य सहकारी बँक, क्रांती शुगर, दुय्यम निबंधक पारनेर, अवसायक पारनेर हेही जबाबदार असल्याचे पुरावे ईडीकडे देण्यात आल्याचे बचाव समितीचे बबनराव कवाद, रामदास सालके यांनी सांगितले. 

ईडीला उपोषणाचा इशारा  पारनेरच्या खरेदीतील गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दोन वर्षांपूर्वीच दिले होते. बचाव समितीने सर्व पुरावे देऊन वेळोवेळी ईडीकडे पाठपुरावाही केला होता. परंतु अद्यापही दखल न घेतल्यामुळे नाईलाजाने आम्हाला ईडीच्या विरोधात मुंबई झोन कार्यालयाबाहेर २० ऑक्टोबर २०२१पासून उपोषणाची घोषणा करावी लागत आहे . या उपोषणात पारनेरचे शेतकरी व सभासद मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. या आंदोलना बाबतचे पत्र दिल्ली व मुंबई येथील अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून देण्यात आले आहे.     

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com