Agriculture News in Marathi Parner factory sale Demand for action against the culprits | Agrowon

पारनेर कारखाना विक्रीतील  दोषींवर कारवाईची मागणी 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 21 सप्टेंबर 2021

नगर जिल्ह्यातील पारनेर सहकारी साखर कारखान्याच्या विक्री प्रक्रियेत झालेल्या घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी कारखाना बचाव समितीने सक्तवसुली संचालनालयाकडे (ईडी) केली आहे.

नगर : नगर जिल्ह्यातील पारनेर सहकारी साखर कारखान्याच्या विक्री प्रक्रियेत झालेल्या घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी कारखाना बचाव समितीने सक्तवसुली संचालनालयाकडे (ईडी) केली आहे. पारनेर साखर कारखाना बचाव समितीच्या प्रतिनिधी रामदास घावटे, बबनराव कवाद यांनी दिल्ली येथे केंद्रीय अर्थमंत्री डॉ. भागवत कराड व ईडीचे मुख्य संचालक संजय मिश्रा यांची दिल्ली येथे भेट घेऊन कारवाईची मागणी केली आहे.

पारनेर कारखाना विक्रीनंतर लगेचच यातील गैरव्यवहाराची तक्रार करण्यात आली होती. पुढे या विषयी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. ऑगस्ट २०१९मध्ये उच्च न्यायालयाने ईडीला कारवाईचे आदेश दिले होते. परंतु ईडीच्या मुंबई झोन कार्यालयाने या बाबत कोणतीच कारवाई केली नाही. न्यायालयाच्या आदेशानंतरही कारवाई केली जात नसल्यामुळे कारखाना बचाव समितीने ईडीच्या मुंबई झोन अधिकाऱ्यांची तक्रार दिल्लीतील मुख्य संचालक व अर्थमंत्री यांच्याकडे केली आहे. 

पारनेर सहकारी साखर कारखाना विक्रीतील भ्रष्टाचार प्रकरणी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात एकूण तीन याचिका दाखल असून, त्यांचे निकाल प्रलंबित आहेत. कारखाना विक्री व्यवहारात मोठ्या प्रमाणात काळा पैसा वापरला असल्याचा संशय आहे .कारखाना विकत घेणारी खासगी कंपनी क्रांती शुगर यांच्याकडे कोणतीही मालमत्ता व भांडवल नसताना सुमारे ३२ कोटी रुपयांना हा कारखाना विकत घेतला होता. 

राज्य सहकारी बँकेने पारनेर कारखाना विक्रीची बोगस प्रक्रिया राबवली होती. कारखाना घेण्यासाठी वापरलेला पैसा काळा पैसा असावा, असा संशय आहे. हा व्यवहार पूर्ण करण्यासाठी एका बड्या राजकीय नेत्याने पैसा पुरवला असल्याची माहिती ईडीला देण्यात आली आहे. आता त्या बाबत ईडी चौकशी करणार आहे. या विक्री गैरव्यवहारात राज्य सहकारी बँक, क्रांती शुगर, दुय्यम निबंधक पारनेर, अवसायक पारनेर हेही जबाबदार असल्याचे पुरावे ईडीकडे देण्यात आल्याचे बचाव समितीचे बबनराव कवाद, रामदास सालके यांनी सांगितले. 

ईडीला उपोषणाचा इशारा 
पारनेरच्या खरेदीतील गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दोन वर्षांपूर्वीच दिले होते. बचाव समितीने सर्व पुरावे देऊन वेळोवेळी ईडीकडे पाठपुरावाही केला होता. परंतु अद्यापही दखल न घेतल्यामुळे नाईलाजाने आम्हाला ईडीच्या विरोधात मुंबई झोन कार्यालयाबाहेर २० ऑक्टोबर २०२१पासून उपोषणाची घोषणा करावी लागत आहे . या उपोषणात पारनेरचे शेतकरी व सभासद मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. या आंदोलना बाबतचे पत्र दिल्ली व मुंबई येथील अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून देण्यात आले आहे. 
 
 


इतर बातम्या
अन्नधान्य भाववाढीच्या चर्चा निराधारपुणे : सध्या अन्नधान्य महागाईच्या चर्चांना ऊत आला...
राज्यात थंडीची चाहूलपुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...
इंधन दरवाढ, महागाई दिसत नाही, कांद्याची...नाशिक : एकीकडे इंधन खर्च, निविष्ठांचे वाढते दर,...
पावसामुळे द्राक्ष हंगामात अडचणी वाढल्यानाशिक : सप्टेंबर महिन्यापासून द्राक्ष उत्पादक...
सरासरी ते सरासरीपेक्षा कमी तापमानाचा...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) १४...
महाराष्ट्राच्या समृद्ध पीकसंपदेचा...संगमनेर, जि. नगर ः ‘‘महाराष्‍ट्रात पिकांची मोठी...
सांगली जिल्ह्यात ५० टक्के द्राक्ष...सांगली : जिल्ह्यात द्राक्ष पिकाच्या फळछाटणीची गती...
आता तुम्हीच शोधा  कुठला कारखाना कुणी... पुणे : गेल्या पंधरा वर्षांत ६५ सहकारी साखर...
स्वाभिमानी-कारखानदार संघर्ष अटळ;  ‘...सांगली : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहू, गुरुदत्त,...
पुणे जिल्ह्यातील आठवडे बाजार  सुरू...पुणे : कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन करून...
सोयीच्या लोकांची प्रकरणे  सोमय्या झाकून...पुणे : राज्यात एकूण ४३ कारखान्यांची विक्री...
लखीमपूर खेरी घटनेतील  शेतकऱ्यांच्या...वर्धा : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे भाजप...
नगर जिल्ह्यात रब्बीची  सहा टक्के पेरणी  नगर ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत रब्बीची ६...
रब्बीत यंदाही राहणार  हरभऱ्याचाच...अकोला : लवकरच रब्बीची लागवड सुरू होत आहे. या...
राज्यभरात निघणार लखीमपूर खेरी  किसान...  नाशिक : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी...
धुळे जिल्हा बँकेत तिघे जण बिनविरोधधुळे ः धुळे-नंदुरबार जिल्हा बँकेची १७ जागांसाठी...
सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या ...बुलडाणा : विदर्भ, मराठवाडा, खानदेशातील कापूस,...
`तंत्रज्ञान पोहोचविण्यात कृषी...हिंगोली  ः ‘‘कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान...
नांदेड जिल्ह्यात ग्रामबीजोत्पादनात सात...नांदेड : जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी सहा हजार ३१...
यवतमाळ :नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या ...आर्णी, यवतमाळ : परतीच्या पावसाने खरीप पिकांची...