Agriculture News in Marathi Partial work of 'Palaskhed' bothers the farmers | Agrowon

रिसोड, जि. वाशीम :‘पळसखेड’च्या अर्धवट कामाचा शेतकऱ्यांना त्रास

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 ऑक्टोबर 2021

शासनासह अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे व वेळकाढू धोरणामुळे कोट्यवधी रुपये खर्च करूनही रिसोड तालुक्यातील पळसखेड प्रकल्पात ३० टक्केच पाणीसाठा होत आहे.

रिसोड, जि. वाशीम : शासनासह अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे व वेळकाढू धोरणामुळे कोट्यवधी रुपये खर्च करूनही रिसोड तालुक्यातील पळसखेड प्रकल्पात ३० टक्केच पाणीसाठा होत आहे. सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे गावालगतच्या शिवारात जाण्यासाठी आठ ते दहा किलोमीटरची पायपीट शेतकऱ्यांना करावी लागते. यामुळे शेतकरी रोष व्यक्त करीत असून, धरणाचे काम पूर्ण करण्याची मागणी केली जात आहे.

तालुक्यातील पळसखेड येथील धरणाचे काम २००४पासून रखडलेले होते. विविध प्रकारची आंदोलने, धरणे, निवेदन दिल्यानंतर प्रकल्पाचे पाणी अडवण्याचे काम २०१९ मध्ये करण्यात आले. मात्र, ३० टक्के पाणी धरणामध्ये साठवले जात असून, ७० टक्के पाणी सांडव्यामधून वाहून जात आहे. त्यामुळे शासनाने या प्रकल्पाकरीता जो काही कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला तो वाया जात आहे. शिवाय प्रकल्पामध्ये पाहिजे, त्या प्रमाणात पाणी साठविल्या जात नसल्याने शेतकऱ्यांना या प्रकल्पाच्या पाण्यावर रब्बी हंगाम तसेच उन्हाळी पिके घेता येत नाहीत. त्यामुळे प्रकल्पाचा मुख्य हेतू साध्य होत नाही. या प्रकल्पामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या त्यांना त्याचा पूर्ण मोबदला अद्याप मिळालेला नाही. त्याकडे शासन दुर्लक्ष करीत आहे तसेच पळसखेड गावाचे पुनर्वसनाचे कामही अद्याप प्रलंबित आहे.

प्रकल्पाच्या प्रलंबित कामामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ते उपलब्ध नाहीत. गावाशेजारील नदीकाठच्या शेतात जाण्यासाठी आठ ते दहा किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. सांडव्यामधून तीन ते चार फुटापर्यंत पाणी मागील तीन महिन्यांपासून वाहत असल्याने शेतकऱ्यांना चक्क रिसोडवरून शेतात जावे लागत आहे. किमान यंदा तरी शासन शेतकऱ्यांच्या मागण्या गांभिर्याने घेईल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.


इतर बातम्या
किमान तापमानात घट होण्याची शक्यतापुणे : राज्यात पावसाने उघडिप दिल्यानंतर किमान...
‘महाडीबीटी’च्या कामात अडथळाअकोला ः कृषी खात्याच्या विविध योजनांचा लाभ...
कृषी निविष्ठा केंद्रांचे परवाने आता...पुणे ः राज्यातील कृषी सेवा केंद्रांना परवान्याची...
आयातीमुळे कडधान्य दर दबावातपुणे ः तुरीचा हंगाम पुढील काही दिवसांत सुरू होईल...
...तर द्राक्षाचे नुकसान टळले असतेनाशिक : गेल्या तीन वर्षांपासून कसमादे भागातील...
साहित्य संमेलनाचे अनुदान शेतकरी,...नाशिक : वामनदादा कर्डक जन्मशताब्दी साहित्यनगरी...
देशी वाणाने सकस उत्पादन ः राहीबाई पोपेरेसांगली : पारंपरिक बियाणाला रासायनिक खताच्या...
वीज पुरवठा सुरळीत न केल्यास  ढोरा...शेवगाव, जि. नगर : महावितरणने थकीत वीज बिलासाठी...
सहा हजार शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज परभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१-२२) रब्बी...
मॉन्सूनोत्तर पावसाचा सांगलीत  १२ हजार...सांगली : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील द्राक्ष,...
शिवरायांच्या स्वराज्यापासून महात्मा...कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी...
मराठवाड्यात आंब्यावर संकटाचे ढगऔरंगाबाद : यंदा आंब्यावर संकटाचे ढग कायम आहेत....
उचंगी प्रकल्पग्रस्तांचे शंभर टक्के...   कोल्हापूर : आजरा तालुक्यातील उचंगी...
श्रीरामपुरात बिबट्याचे चार तास...श्रीरामपूर, जि. नगर ः श्रीरामपूर शहरातील मोरगे...
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करू :...सांगली ः गेल्या काही दिवसापांसून संपूर्ण राज्यात...
क्षारपड जमीन सुधारण्यासाठी  केंद्राचे...कोल्हापूर : क्षारपड जमीन सुधारणा योजनेस केंद्र...
पावसामुळे द्राक्ष बागांचे  दोन हजार...पुणे ः जिल्‍ह्यात गेल्या आठवड्यात १ आणि २ डिसेंबर...
खानदेशात पुन्हा ढगाळ वातावरण कायम जळगाव ः  खानदेशात पावसाळी व ढगाळ वातावरण...
चाळीसगाव (जि.जळगाव) : अवकाळी पावसामुळे...चाळीसगाव, जि.जळगाव : चाळीसगाव, पाचोरा, भडगाव आदी...
जळगावः अॅग्रोवन व आयसीएल कंपनीतर्फे...जळगाव ः ॲग्रोवन आणि आयसीएल कंपनीच्या संयुक्त...