कृषिपंप वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीत सहभागी व्हा

सोलापूर ः कृषिपंपाच्या वीजबिलातून थकबाकीमुक्त होण्यासाठी थकबाकीच्या रकमेत सुमारे ६६ टक्के सूट मिळविण्याची संधी राज्य शासनाच्या कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० च्या माध्यमातून उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागा घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
Participate in agricultural pump electricity bill arrears
Participate in agricultural pump electricity bill arrears

सोलापूर ः कृषिपंपाच्या वीजबिलातून थकबाकीमुक्त होण्यासाठी थकबाकीच्या रकमेत सुमारे ६६ टक्के सूट मिळविण्याची संधी राज्य शासनाच्या कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० च्या माध्यमातून उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागा घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० मधून शेतकऱ्यांना कृषिपंपाच्या वीजबिलातून थकबाकीमुक्त करण्यासाठी सुमारे ६६ टक्के सूट मिळणार आहे. मूळ थकबाकीमधील व्याज व दंड माफी तसेच निर्लेखन यानंतरच्या सुधारित थकबाकीची ५० टक्के रक्कम येत्या मार्च २०२२ पर्यंत

भरल्यास उर्वरित ५० टक्के थकबाकीदेखील माफ करण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १ लाख ८५ हजार ८३८ शेतकऱ्यांनी थकबाकीमुक्त योजनेत सहभाग नोंदविला आहे. यामध्ये त्यांनी थकबाकी व चालू वीजबिलापोटी १४१ कोटी ८ लाख रुपयांचा भरणा केला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना थकबाकीपोटी भरलेल्या रकमेएवढी सूट, महावितरणकडून निर्लेखनद्वारे मिळालेली सूट तसेच विलंब आकार व व्याजातील सूट अशी एकूण ७५३ कोटी ५२ लाख रुपये माफ झाले आहेत. यामध्ये ९ हजार २५५ शेतकरी वीजबिलांमधून संपूर्णपणे थकबाकीमुक्त झाले आहेत. त्यांनी चालू वीजबिलासह सुधारित थकबाकीच्या ५० टक्के रकमेचे एकूण ३८ कोटी ९१ लाख रुपयांचा भरणा केला आहे. त्यामुळे सुधारित थकबाकीमध्ये त्यांना आणखी २८ कोटी ८ लाख रुपयांची सूट व संपूर्ण थकबाकीमुक्ती मिळाली आहे.

या योजनेत वीजबिलांच्या वसुलीतून एकूण ६६ टक्के कृषी आकस्मिक निधी म्हणजेच प्रत्येकी ३३ टक्के निधी ग्रामपंचायत व जिल्हास्तरावर विकासकामांसाठी खर्च करण्यात येत आहे. निधी वीजयंत्रणेच्या पायाभूत सुविधांच्या सक्षमीकरणासाठी खर्च करण्यात येणार आहे. 

सोलापुरात साडेतीन हजार कोटीची कृषिपंपाची थकबाकी

सोलापूर जिल्ह्यातील ३ लाख ६८ हजार १३४ शेतकऱ्यांकडे एकूण ५२०४ कोटी रुपयांची एकूण थकबाकी होती. त्यातील व्याज व दंड माफीसोबतच महावितरणच्या निर्लेखन सूटद्वारे आता ३५९९ कोटी २० लाख रुपयांची सुधारित थकबाकी आहे. त्यातील ५० टक्के रक्कम येत्या मार्च २०२२ पर्यंत भरल्यास आणखी १७९९ कोटी ६० लाख रुपयांच्या उर्वरित सुधारित थकबाकीची रक्कम माफ होणार आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com