agriculture news in Marathi participation of farmers and groups increased for direct sell Maharashtra | Agrowon

थेट विक्रीसाठी शेतकरी, गटांचा सहभाग वाढला

टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 एप्रिल 2020

ग्राहकांची मागणी शेतकरी व शेतकरी गटांकडे नोंदविली जात आहे. रास्त दरात फळे भाजीपाला मिळत असल्याने ग्राहकांचीही पसंती या उपक्रमाला मिळते आहे. बाजारातील गर्दी टाळण्यासाठी शहरातील सोसायट्यांनी थेट शेतकऱ्यांकडून फळे भाजीपाला खरेदीसाठी पुढे यावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- डॉ. तुकाराम मोटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, औरंगाबाद

औरंगाबाद: शहरातील ग्राहकांकडून संचार बंदीच्या काळात थेट शेतकऱ्यांकडून फळे भाजीपाला खरेदीला पसंती मिळत आहे. कृषी पणन सहकार महानगरपालिका व जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नातून शेतकऱ्यांकडून थेट ग्राहकांना शेतमाल विक्रीची प्रक्रिया सुरू झाली. दोन दिवसात या प्रक्रियेतून जवळपास दीडशे क्विंटल फळे भाजीपाल्यांची ग्राहकांनी खरेदी केली.

कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या संचार बंदीमुळे शेतमालाची विक्री करण्याची अडचण निर्माण झाली होती. जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने व फळे भाजीपाला विक्री सुरू राहणार असल्याचे कळले असले तरी ग्राहकांकडून औरंगाबाद बाजार समितीमध्ये खरेदीसाठी गर्दी केली जात होती.

ही गर्दी कमी करण्यासाठी उपाययोजना म्हणून जिल्हा प्रशासनाच्यावतीने शेतकऱ्यांकडून थेट ग्राहकांना फळे भाजीपाला विक्रीचे नियोजन करण्यात आले. त्यासाठी बंद पडलेले शेतकरी आठवडे बाजार नियम व सूचनांच्या अधीन राहून सुरू करण्यात आले. याशिवाय कृषी विभागाकडून विविध शेतकरी व शेतकरी गटांना त्यांच्या उत्पादित शेतमालाच्या थेट ग्राहकांना विक्रीसाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले.

त्याचा परिणाम म्हणून औरंगाबाद जिल्ह्यातील विविध गावातील जवळपास २१ फळे व भाजीपाला उत्पादक शेतकरी तथा शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांनी आपल्याकडील उत्पादित फळे भाजीपाला थेट ग्राहकांना विक्रीची तयारी दाखवली. 

२९ मार्चला पहिल्याच दिवशी या शेतकरी शेतकरी गट व फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या उत्पादित फळे भाजीपाल्याची जवळपास १३ शेतकरी, शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांनी ७४१३ किलो विक्री केली.

३० मार्चला थेट विक्री करण्याची तयारी दाखवणाऱ्या शेतकरी व गटांची संख्या २८ वर पोहोचली. तर त्यापैकी जवळपास १६ शेतकरी गटांनी ७४६१ किलो भाजीपाला व फळांची थेट ग्राहकांना विक्री केली.रास्त दरात थेट शेतकऱ्यांकडून फळे भाजीपाला मिळत असल्याने ग्राहकही त्याला प्रतिसाद देत असल्याचे चित्र आहे.

बाजार समितीमधील किरकोळ खरेदी बंद
शहरातील जाधववाडी बाजार समितीमधील फळे, भाजीपाला बाजारातील किरकोळ खरेदी मंगळवारपासून (ता.३१) बंद करण्यात आल. या किरकोळ खरेदीसाठी मुख्य रस्त्यालगत दुकाने लागली होती. तर बाजार समितीमध्ये ठोक खरेदी विक्रीचा सुरू असल्याने बाजार समिती आवारात होणारी गर्दी कमी झाली होती.


इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधारपुणे : राज्यातील बहुतांशी भागातील पावसाचे...
राज्यात हलक्या पावसाची शक्यतापुणे : काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस...
एक हजार प्राध्यापकांनी वयाची साठी...पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमधील...
सूक्ष्म अन्न उद्योगांना मिळणार आता दहा...पुणे: राज्यात लवकरच पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग...
कृषी, कामगार विधेयकांची राज्यात...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर करुन घेतलेली...
शेतकरी आंदोलनाचे सात राज्यांत पडसादचंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना विरोध...
सोयाबीन बियाणे प्लॉटना फटकाऔरंगाबाद: सध्याचे पावसाचे प्रमाण व त्यामुळे...
केळी विमा निकषांबाबत उत्सुकताजळगाव ः राज्य सरकारच्या चुकांमुळे हवामानावर...
अडीच हजार हेक्टर भातशेती सततच्या...सिंधुदुर्ग ः हळवी आणि भिजवणीची लागवड केलेली...
कृषी विधेयकांविरोधात राज्यात शेतकरी...पुणेः केंद्र सरकारने नुकतेच मंजूर केलेल्या कृषी...
सेंद्रिय व्यवस्थापनाच्या बळावर रोखली...सर्वाधिक संत्रा लागवडीखाली क्षेत्र असल्यामुळे ‘...
ऑनलाइन शिक्षणात बरेच ऑफलाइन! पाऊस आणि शाळा, महाविद्यालयं सुरू होण्याचा काळ...
आता शेतमाल खरेदीचे बोला!ऑगस्ट २०२० च्या पहिल्या आठवड्यात देशभरातील खरीप...
उद्योजकांच्या कर्जमाफीवर सर्वांचीच...भारतात शेती आणि शेतकरी याला खूप महत्त्व आहे....
खरीप धान्योत्पादन १४४ दशलक्ष टनांवर नवी दिल्ली ः कोरोना पुणे मुंबई बातमी ...
ऊसतोड कामगार मंडळाची रचना, धोरण लवकरचः...मुंबई : ऊसतोड कामगारांचे विविध प्रश्न व समस्यांवर...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्या...पुणे ः राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. पुढील...
‘पोकरा’मधून फळबाग, वनशेती, बांबू, तुती...औरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
पावसाळ्यापूर्वीच कापूस खरेदीचे नियोजन अमरावती : गेल्या हंगामात पावसामुळे कापसाचे नुकसान...
सुधारित शेती, पूरक व्यवसायाचा ‘निवजे...निवजे (ता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग) गावकऱ्यांनी शेती...