agriculture news in marathi, partly cloudy in state | Agrowon

अंशत: ढगाळ हवामान; ब्रह्मपुरीत सर्वाधिक तापमान

टीम अॅग्रोवन
शनिवार, 11 मे 2019

पुणे : विदर्भातील काही भागांत अजूनही उष्णतेची लाट कायम आहे. या भागातील कमाल तापमानाचा पारा वाढलेलाच आहे. अरबी समुद्राकडून काही अंशी बाष्प कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या दिशेने वाहत आहे. यामुळे या भागांत काही अंशी ढगाळ हवामान असून कमाल तापमानात कमालीची घट झाली आहे. शुक्रवारी (ता. १०) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत विदर्भातील ब्रह्मपुरी येथे ४५.८ अंश सेल्सिअसची देशातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  

पुणे : विदर्भातील काही भागांत अजूनही उष्णतेची लाट कायम आहे. या भागातील कमाल तापमानाचा पारा वाढलेलाच आहे. अरबी समुद्राकडून काही अंशी बाष्प कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या दिशेने वाहत आहे. यामुळे या भागांत काही अंशी ढगाळ हवामान असून कमाल तापमानात कमालीची घट झाली आहे. शुक्रवारी (ता. १०) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत विदर्भातील ब्रह्मपुरी येथे ४५.८ अंश सेल्सिअसची देशातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  

उडीसा ते रायलसीमा आणि उडिसा ते कोमोरिन परिसर, दक्षिण छत्तीसगड, तेलंगाना, तमिळनाडू या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र आहे. तसेच, आंध्रप्रदेशाच्या परिसरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होत तापमानात चढउतार सुरू आहे. आज विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहील. दुपारनंतर हवामानात अचानक बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोमवार (ता. १३) पर्यंत मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह, सोसाट्याचा वारा व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. उष्णतेच्या लाटेमुळे विदर्भात अजूनही झळा तीव्र आहे. यामुळे या भागातील कमाल तापमान गेल्या दहा ते बारा दिवसांपूर्वी ४७ अंशांपर्यंत गेले होते. मात्र, आता या भागातील कमाल तापमानाचा पारा ४५ अंशांच्या दरम्यान आहे. 

उर्वरित चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ, अमरावती, अकोला या भागांत कमाल तापमान ४२ ते ४४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मराठवाड्यातील काही भागांत ढगाळ हवामान असल्याने कमाल तापमानात किंचित घट झाली आहे. त्यामुळे या भागातील तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मध्य महाराष्ट्रातील काही भागांतील कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत एक ते तीन अंश सेलिअसने घट झाली आहे. त्यामुळे या भागातील तापमान २९ ते ४० अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. कोकणातील कमाल तापमानाचा पारा घसरलेला आहे. त्यामुळे उष्णता काही प्रमाणात कमी झाली आहे.

शुक्रवारी (ता. १०) सकाळी साडे आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांतील विविध ठिकाणचे कमाल, कंसात सरासरीच्या तुलनेत किमान तापमानातील वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३६.० (-१.७), जळगाव ४०.६ (-२.४), कोल्हापूर ३४.७ (-१.९), महाबळेश्‍वर २९.६ (-१.७), नाशिक ३४.३ (-३.९), सांगली ३६.३ (-१.९), सातारा ३६.१ (-०.९), सोलापूर ४०.२ (०.६), मुंबई ३३.५ (०.२), अलिबाग ३३.५ (०.९), रत्नागिरी ३३.८ (१.२), डहाणू ३४.६ (०.८), औरंगाबाद ३८.६ (-१.०), बीड ४०.५ (०.२), नांदेड ४२.५ (०.८), परभणी ४२.९ (१.०), उस्मानाबाद ४०.१ (०.७), अकोला ४३.० (०.७), अमरावती ४३.० (०.५), बुलढाणा ३९.० (०.४) ब्रह्मपुरी ४५.८ (३.७), चंद्रपूर ४५.४ (२.६), गोंदिया ४३.० (१.०), नागपूर ४४.६ (२.४), वर्धा ४४.२ (१.४), वाशीम ४२.२, यवतमाळ ४२.५ (०.८).


इतर अॅग्रो विशेष
‘पीएम-किसान’चा १२ कोटी शेतकऱ्यांना...नवी दिल्ली: शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा खरेदीसाठी...
पंजाबमध्ये भूमिहीन शेतमजुरांना कर्जमाफीचंदीगड, पंजाब: राज्याचा २०२०-२१ चा १.५४ लाख...
देशात ११० लाख टन हरभरा उत्पादनाचा अंदाजनवी दिल्ली: देशात यंदा हरभरा उत्पादनात वाढ...
‘पोकरा’तील सामुदायिक शेततळे, शेळीपालन...अकोला ः राज्यात राबविल्या जात असलेल्या नानाजी...
वन्यप्राण्यांचा वाढता तापअकोला जिल्ह्यातील तांदुळवाडी येथील एका...
पीकविम्यातील बदलांचा लाभ कुणाला?‘ऐच्छिक’ घात  देशभरात एकूण शेतकऱ्यांपैकी ५८...
एक लाख टन मका म्यानमारमधून आयातनवी दिल्ली: देशात यंदा कमी उत्पादन झाल्याने...
राज्यातील बावीस कारखान्यांचा गाळप हंगाम...कोल्हापूर  : राज्यातील ऊस गाळप हंगाम हळूहळू...
दूध संकलनासह पदार्थनिर्मितीतून प्रगतीपुणे जिल्ह्यातील वढू (ता. शिरूर) येथील सुनील आणि...
एकलव्य शेतकरी बचत गटाचे उपक्रमगोळप (ता. जि. रत्नागिरी) गावातील एकलव्य शेतकरी...
विदर्भात आज गारपिटीचा इशारापुणे : पूर्व आणि पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा...
संघर्ष येथील संपणार कधी? शेती कसत असताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, करावा...
`ज्ञानेश्‍वरी'त दडलंय कृषी विज्ञान कां सु क्षेत्री बीज घातले।  ते आपुलिया परी...
निर्यातबंदी उठविल्याचे कांदा बाजारात...नाशिक : केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री...
साडेआठशे कोटींची एफआरपी थकलीपुणे: राज्यातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक...
‘जानुबाई’, ‘केशवराज’ संस्था ठरल्या...पुणे: पाणीवापर संस्थांच्या माध्यमातून प्रभावी...
साम टीव्ही न्यूज महाराष्ट्रात ‘नंबर १’मुंबई ः सर्वोत्तम न्यूज चॅनेल्सच्या स्पर्धेत ‘...
कृषी परिषदेने विद्यापीठांसाठी नेमले...पुणे : महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे: पावसाला पोषक हवामान होत असल्याने विदर्भ,...
शेतकऱ्यांना खते, बियाणे अन् महिलांना...शुद्ध पाणीपुरवठा, गावाअंतर्गत सिमेंट रस्ते,...