हिंगोली ः जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ३ लाख ५८ हजार ४०३ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे.
बातम्या
राज्यातील काही भागांत अंशतः ढगाळ वातावरण
तापमानात वाढ होत आहे. उद्यापासून (ता. ९) कोकण, मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भाग, मराठवाड्याचा काही भाग आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाच्या मध्यम ते जोरदार सरी पडण्याचा इशारा हवामान विभागाच्या सूत्रांनी दिला.
पुणे : राज्यातील वातावरणात बदल होऊ लागले आहे. काही भागांत अंशत ढगाळ वातावरण तयार होत आहे. त्यामुळे उकाड्यात वाढ होत असल्याने कमाल तापमानात वाढ होत आहे. उद्यापासून (ता. ९) कोकण, मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भाग, मराठवाड्याचा काही भाग आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाच्या मध्यम ते जोरदार सरी पडण्याचा इशारा हवामान विभागाच्या सूत्रांनी दिला.
कोमोरिनचा भाग आणि परिसर ते उत्तर कर्नाटक या भागात कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. हा पट्टा समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे. तसेच दक्षिण अंदमान समुद्र आणि उत्तर सुमात्रा किनारपट्टीदरम्यान चक्रीय वाऱ्यांची स्थिती सक्रिय होत आहे. ही स्थिती समुद्र सपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर आहे. तसेच झारखंड आणि छत्तीसगडचा उत्तर भाग व परिसरात चक्रीय वाऱ्यांची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ९०० मीटर ते १.५ किलोमीटरच्या दरम्यान आहे. याशिवाय उत्तर अंदमान समुद्र आणि दक्षिण म्यानमारची किनारपट्टी या भागातही चक्रीय वाऱ्यांची स्थिती सक्रिय असल्याने समुद्रावरील असलेले बाष्प हे चक्रीय स्थिती खेचून घेत आहे. त्यामुळे राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र विदर्भात काही अंशी ढगाळ वातावरण आहे.
सध्या सकाळपासून आकाश निरभ्र असल्याने राज्यातील अनेक भागांत उन्हाचा चटका वाढत आहे. दहा वाजेनंतर हा चटका वाढत जाऊन दुपारी कमालीचा उन्हाचा तडाखा वाढत आहे. बुधवारी (ता. ७) सकाळी चोवीस तासांत विदर्भातील चंद्रपूर येथे सर्वाधिक ४३.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंदविले गेले. कमाल तापमानाबरोबर किमान तापमानातही वाढ होत आहे. पुणे येथे १८.७ सेल्सिअस सर्वांत कमी तापमान नोंदविले गेले.
येथे होणार अवकाळी पाऊस
शुक्रवार ः सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, नांदेड, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा
शनिवार ः सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, जालना, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ
रविवार ः सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, नागपूर, यवतमाळ
- 1 of 1591
- ››