राष्ट्रवादी काँग्रेस नेतृत्वाची फळी निर्माण करणारा पक्ष ः शरद पवार

सर्व घटकांचे प्रश्‍न सोडवून घेणारा, त्या घटकातील नेतृत्वाची फळी तयार करणारा एक पक्ष काम करतोय. हे चित्र निर्माण करून अधिक जोमाने या कामाला लागूया. यामधून संपूर्ण देशाला एक नवीन रस्ता दाखवूया, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी (ता. १०) केले.
The party that forms the NCP leadership board: Sharad Pawar
The party that forms the NCP leadership board: Sharad Pawar

मुंबई ः राष्ट्रवादी काँग्रेस हा समाजातील उपेक्षित घटकांच्या पाठीशी उभा राहतो. तसेच त्यांच्या हातात निर्णय घेण्याची प्रक्रिया सुपूर्त करून त्यांच्यामार्फत सर्व घटकांचे प्रश्‍न सोडवून घेणारा, त्या घटकातील नेतृत्वाची फळी तयार करणारा एक पक्ष काम करतोय. हे चित्र निर्माण करून अधिक जोमाने या कामाला लागूया. यामधून संपूर्ण देशाला एक नवीन रस्ता दाखवूया, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी (ता. १०) केले. 

राष्ट्रवादी काँग्रेसचा २२ वा वर्धापन दिन आज प्रदेश कार्यालयात साजरा करण्यात आला. त्या वेळी मार्गदर्शन करताना श्री. पवार यांनी अनेक घडामोडींना व विषयांना हात घालत राजकीय विरोधकांना चांगलीच चपराक लगावली आहे. 

मराठा आरक्षण असेल किंवा ओबीसींचा स्थानिक स्वराज्य संस्थेमधील जागेचा गंभीर प्रश्‍न असेल ते आपल्याला सोडवावेच लागतील. त्यामुळे तुमची सत्ता अधिक हातांमध्ये गेली पाहिजे. सत्ता एकाच ठिकाणी राहिली तर ती सत्ता भ्रष्ट होते. सत्ता भ्रष्ट व्हायची नसेल तर ती सत्ता अधिक लोकांच्या हातांमध्ये गेली पाहिजे आणि अधिक लोकांच्या हातांमध्ये गेली हे सूत्र आपल्याला मान्य असेल तर एस्सी, एसटी आणि ओबीसी असतील त्यातल्या प्रत्येक घटकाला मी सत्तेचा वाटेकरी आहे हे वाटलं पाहिजे. याची काळजी आपण घेऊया. अशामुळे आपल्याला लोकांचा अधिक पाठिंबा मिळेल, असे श्री. पवार या वेळी म्हणाले. 

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, की कोरोना संक्रमण कमी झाल्यावर पक्ष बळकटीसाठी महाराष्ट्र दौरा आखला जाईल. यातून कार्यकर्त्यांशी थेट बोलण्याची संधी मिळेल. तसेच आजपासून पक्षाच्या सभासद नोंदणीचे काम सुरू करण्यात येईल.

कोणावरही अन्याय होणार नाही ः अजित पवार पेट्रोल-डिझेलचे दर शंभरी गाठत आहेत. घरगुती गॅसचे दर वाढले आहेत. विमान-रेल्वेचा प्रवास महागला आहे. बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. या सर्व प्रश्‍नांवर देखील आपल्याला काम करायचे आहे. मराठा समाजाचे आरक्षण, ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण आणि इतर प्रश्‍नांवर देखील काम करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध आहे. कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही अशी आपली भूमिका आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com