Agriculture news in Marathi The party that forms the NCP leadership board: Sharad Pawar | Agrowon

राष्ट्रवादी काँग्रेस नेतृत्वाची फळी निर्माण करणारा पक्ष ः शरद पवार

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 11 जून 2021

सर्व घटकांचे प्रश्‍न सोडवून घेणारा, त्या घटकातील नेतृत्वाची फळी तयार करणारा एक पक्ष काम करतोय. हे चित्र निर्माण करून अधिक जोमाने या कामाला लागूया. यामधून संपूर्ण देशाला एक नवीन रस्ता दाखवूया, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी (ता. १०) केले. 

मुंबई ः राष्ट्रवादी काँग्रेस हा समाजातील उपेक्षित घटकांच्या पाठीशी उभा राहतो. तसेच त्यांच्या हातात निर्णय घेण्याची प्रक्रिया सुपूर्त करून त्यांच्यामार्फत सर्व घटकांचे प्रश्‍न सोडवून घेणारा, त्या घटकातील नेतृत्वाची फळी तयार करणारा एक पक्ष काम करतोय. हे चित्र निर्माण करून अधिक जोमाने या कामाला लागूया. यामधून संपूर्ण देशाला एक नवीन रस्ता दाखवूया, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी (ता. १०) केले. 

राष्ट्रवादी काँग्रेसचा २२ वा वर्धापन दिन आज प्रदेश कार्यालयात साजरा करण्यात आला. त्या वेळी मार्गदर्शन करताना श्री. पवार यांनी अनेक घडामोडींना व विषयांना हात घालत राजकीय विरोधकांना चांगलीच चपराक लगावली आहे. 

मराठा आरक्षण असेल किंवा ओबीसींचा स्थानिक स्वराज्य संस्थेमधील जागेचा गंभीर प्रश्‍न असेल ते आपल्याला सोडवावेच लागतील. त्यामुळे तुमची सत्ता अधिक हातांमध्ये गेली पाहिजे. सत्ता एकाच ठिकाणी राहिली तर ती सत्ता भ्रष्ट होते. सत्ता भ्रष्ट व्हायची नसेल तर ती सत्ता अधिक लोकांच्या हातांमध्ये गेली पाहिजे आणि अधिक लोकांच्या हातांमध्ये गेली हे सूत्र आपल्याला मान्य असेल तर एस्सी, एसटी आणि ओबीसी असतील त्यातल्या प्रत्येक घटकाला मी सत्तेचा वाटेकरी आहे हे वाटलं पाहिजे. याची काळजी आपण घेऊया. अशामुळे आपल्याला लोकांचा अधिक पाठिंबा मिळेल, असे श्री. पवार या वेळी म्हणाले. 

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, की कोरोना संक्रमण कमी झाल्यावर पक्ष बळकटीसाठी महाराष्ट्र दौरा आखला जाईल. यातून कार्यकर्त्यांशी थेट बोलण्याची संधी मिळेल. तसेच आजपासून पक्षाच्या सभासद नोंदणीचे काम सुरू करण्यात येईल.

कोणावरही अन्याय होणार नाही ः अजित पवार
पेट्रोल-डिझेलचे दर शंभरी गाठत आहेत. घरगुती गॅसचे दर वाढले आहेत. विमान-रेल्वेचा प्रवास महागला आहे. बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. या सर्व प्रश्‍नांवर देखील आपल्याला काम करायचे आहे. मराठा समाजाचे आरक्षण, ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण आणि इतर प्रश्‍नांवर देखील काम करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध आहे. कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही अशी आपली भूमिका आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.


इतर बातम्या
फळपीक विमा योजनेत त्रुटी, गोंधळसोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा...
पूर्व विदर्भात मुसळधार शक्य पुणे : कोकण ते केरळ दरम्यान असलेले कमी दाबाचे...
पूर्वहंगामी द्राक्षाचे विमा कवच चारपट...नाशिक : गेल्या काही वर्षांत नैसर्गिक आपत्तीमुळे...
‘एचटीबीटी’ बियाण्याची पाळेमुळे...पुणे ः देशात अवैध तणनाशक सहनशील ‘एचटीबीटी’ कापूस...
डाळिंब विमा अर्जासाठी १४ जुलैपर्यंत...सांगली : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत पुनर्रचित...
उसासाठी यंदाची ‘एफआरपी’ जाहीर कराकोल्हापूर : यंदाच्या गळीत हंगामातील उसाची एफआरपी...
कांदा व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याला मारहाण नाशिक : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची...
शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड  ...नाशिक : राज्यात खरीप हंगामास सुरुवात झाली असून,...
अमरावती जिल्हा परिषदेची सभा...अमरावती : पीकविमा भरपाई, समृद्धी महामार्गाच्या...
संत्रा आयात शुल्क कपातीसाठी प्रयत्न करा...नागपूर : विदर्भाचे मुख्य फळपीक असलेल्या...
दूधदरप्रश्‍नी वैजापूर बाजार समितीच्या...औरंगाबाद : दूध उत्पादकांच्या मागण्याच्या...
खेडमध्ये बटाटा लागवडीस वेगचास, जि. पुणे : खेड तालुक्यात बटाटा लागवडीस...
स्थानिक काजूची आवक आजरा तालुक्यात...आजरा, जि. कोल्हापूर : आजरा बाजारपेठेत स्थानिक...
लाभार्थी शेतकऱ्यांचे अनुदान तातडीने अदा...बुलडाणा : शासन शेतकऱ्यांचा जीवनस्तर उंचविण्यासाठी...
पुणे बाजार समितीची ‘प्रादेशिक’ अधिसूचना...पुणे : पुणे बाजार समितीची निवडणूक टाळून सत्ता एका...
कांद्याची २५ दिवसांत विक्रमी अकरा लाख...नाशिक : जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात युरियाप्रश्नी प्रशासनाची धावपळजळगाव :  खानदेशात खरिपाला सुरवात होत असतानाच...
‘डीएससी’त अडथळे  आणल्यास कारवाई करापुणे ः राज्यातील सरपंच व ग्रामसेवकांचे संगणकीय...
खानदेशात बाजार समित्यांचे कामकाज पूर्ववतजळगाव :  खानदेशात बाजार समित्यांचे कामकाज...
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५, ६ जुलै... मुंबई : कोरोना संकटाची सध्याची स्थिती पाहता आणि...