खजूर लागवडीचा समावेश फळबाग योजनेत करा: पाशा पटेल

पाशा पटेल
पाशा पटेल

पुणे : मराठवाड्यात खजूर लागवड शक्य असल्याचे प्रयोगाअंती सिद्ध झाले आहे. तसा अहवाल डॉ. वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठाने दिला आहे. यामुळे खजूर लागवडीसाठी या पिकाचा समावेश अनुदानित फळबाग लागवड योजनेत करावा, अशी मागणी राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.  खजूर हे कोरड्या हवामानात येणारे पीक असून, १० वर्षांच्या झाडापासून प्रति झाड २५० किलो खजुराचे उत्पादन मिळते. एकरी ७५ झाडांपासून वर्षाला विद्यमान दरानुसार सुमारे १० लाखांचे उत्पन्न मिळू शकते. मराठवाड्यात खजूर लागवडीचा यशस्वी प्रयोग बागेश्‍वरी साखर कारखान्याने केला आहे. या प्रयोगाचा अभ्यास कृषी विद्यापीठाने केला असून, मराठवाड्यात खजुराची यशस्वी शेती करणे शक्य असल्याचा अहवाल सादर केला आहे. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना नवे पीक आणि प्रक्रिया उद्योग संधी निर्माण होणार असून, खजूर लागवडीतून झांडांचे प्रमाण वाढून पर्यावरणीय समतोल राखला जाणार आहे.  मराठवाड्यात १०० एकर क्षेत्रावर खजूर लागवडीस प्रोत्साहन दिल्यास, त्यावर आधारित प्रक्रिया उद्योगातून रोजगार संधीदेखील उपलब्ध होणार आहे. यासाठी या खजूर लागवड ही अनुदानित फळबाग लागवड योजनेत समावेश करावा, अशी मागणी श्री. पटेल यांनी केली आहे. महाराष्ट्रातही हवे लागवड अनुदान गुजरात व राजस्थान राज्यात खजूर फळपिकाच्या लागवडीसाठी अनुदान देण्यात येते. याच धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खजूर फळ पीक लागवडीसाठी अनुदान मिळाल्यास शेतकऱ्यांना पर्यायी पीक मिळून आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. याकरिता राज्याच्या अनुदानित फळबाग लागवड योजनेत समावेश करावा, असे पटेल यांनी म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com