agriculture news in marathi Pasha Patel demands for cotton repurchase from farmers of vidharbha, Marathwada | Agrowon

मराठवाडा, विदर्भात कापूस खरेदी केंद्र सुरू करा : पाशा पटेल

टीम अॅग्रोवन
सोमवार, 13 एप्रिल 2020

सोशल डिस्टन्सिंगचा वापर करीत मराठवाडा व विदर्भात शासनाने कापूस खरेदी केंद्र सुरू करावेत, अशी मागणी राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केली आहे.

लातूर : मराठवाडा व विदर्भात अद्यापही शेतकऱ्यांच्या घरात चाळीस टक्के कापूस आहे. भाव वाढेल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी हा कापूस घरी ठेवलेला आहे. त्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊऩ झाले. याचा परिणाम कापूस खरेदीवरही झाला आहे. सोशल डिस्टन्सिंगचा वापर करीत मराठवाडा व विदर्भात शासनाने कापूस खरेदी केंद्र सुरू करावेत, अशी मागणी राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडियाच्या कार्यकारी संचालक अली इराणी यांच्याकडे केली आहे.

कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे शेतकरी अडचणीत आला आहे. त्यात मराठवाडा व विदर्भात कापूस उत्पादक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर कापूस खरेदी केंद्र सुरू होणे गरजेचे आहे. याकरिता श्रीमती इराणी यांच्याशी चर्चा केली आहे. तामिळनाडू सरकारने ज्या प्रमाणे मार्केटिंगची व्यवस्था उभी केली आहे तशी व्यवस्था महाराष्ट्र सरकारने उभी केली तर शंभर टक्के कापूस खरेदी केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिल्याचे श्री. पटेल यांनी सांगितले.

या संदर्भात राज्याच्या पणन सचिवांशी चर्चा केली आहे. यवतमाळ जिल्ह्यात खरेदीसाठी परवानगी दिली आहे. ती यशस्वी झाल्यानंतर इतर जिल्ह्यात खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील असे सांगितले आहे. लवकर हे खरेदी केंद्र सुरू करावेत अशी मागणीही त्यांच्याकडे करण्यात आल्याचे ते म्हणाले. तूर, हरभरा खरेदीच्या संदर्भात नाफेडचे कार्यकारी संचालक संजय चड्डा यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. लॉकडाऊन उठल्यानंतर बाजारात तूर आणि हरभरा मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे. असे झाले तर भाव पडणार आहेत. त्यात शेतकऱ्यांचेच नुकसान होणार आहे. हे लक्षात घेऊन राज्यात खरेदी केंद्राची संख्या वाढवावी व ती सुरू करावीत, अशी मागणी पणन सचिवांकडे करण्यात आली आहे. तसेच या संदर्भात कृषिमंत्री व कृषी सचिवांकडेही मागणी करण्यात आल्याचे श्री. पटेल यांनी सांगितले.

औरंगाबाद व जालना जिल्ह्यात मोसंबी मोठ्या प्रमाणात आली आहे. पैठण तसेच लातुरमध्ये असलेल्या कोल्ड स्टोअरेजमध्ये ती ठेवली गेली तर पुढे त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. पण या करिता कोल्ड स्टोअरेजचे भाडे केंद्र व राज्य सरकारने द्यावे अशी मागणीही करण्यात आल्याचे श्री. पटेल यांनी दिली. 


इतर ताज्या घडामोडी
बार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य...सोलापूर : बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
सोलापूर जिल्ह्यात पिकांच्या...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग...
परभणी, हिंगोलीत सोयाबीन, तुर, कपाशीचे...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील मंडळांत...
परभणी जिल्ह्यात पावसाचा सोयाबीन पिकाला...परभणी : जिल्ह्यात दीर्घ खंडानंतर पावसाचे आगमन...
विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडलेनांदेड : गोदावरी नदीवरील विष्णुपुरी...
खानदेशात नुकसानीबाबत सोयाबीनचेही...जळगाव ः मूग, उडीद नुकसानीसंबंधी गेल्या...
जळगाव जिल्ह्यात बाजार समित्यांकडून...जळगाव ः जिल्ह्यात काही बाजार समित्यांचा...
परजिल्ह्यातील कारखान्यांची खानदेशातील...जळगाव ः खानदेशात उसाचे क्षेत्र यंदा...
पंजाब, हरियानात शेतकऱ्यांची आंदोलने नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषिविषयक...
चक्रीवादळाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई...सिंधुदुर्ग ः निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीकरिता...
नगर जिल्ह्यात मूग उत्पादकतेत यंदा...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने...
मुळा धरणातून वीस हजार क्युसेक विसर्गनगर ः नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार...
पावसाने सोयाबीनला फुटले कोंबवाशीम ः जिल्ह्यात काही भागात सततच्या पावसामुळे...
औरंगाबाद, लातूरमध्ये पावसाचा धुमाकूळऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच...
पोषणयुक्त आहार घेण्यावर भर द्या : पाटीलनाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने...
कांदा निर्यातबंदी विरोधात ‘सोशल मीडिया...नाशिक : २०१३-१४ मध्ये सोशल मीडियाचा मोठ्या...
कारखान्यांना २५ बेडचे हॉस्पिटल बंधनकारकसोलापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम १५ ऑक्‍...
निर्यात अडथळे, बियाणे दराचा कांदा...जळगाव ः खानदेशात प्रतिकूल वातावरणामुळे खरिपातील...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...