agriculture news in marathi, Pasha Patel gets the state minister's status | Agrowon

पाशा पटेल यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा

टीम अॅग्रोवन
शनिवार, 18 नोव्हेंबर 2017

मुंबई : राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. या संदर्भात गुरुवारी (ता. १६) राज्य शासनाने आदेश काढले आहेत.

राज्यातील शेतमालाला किफायतशीर भाव मिळावेत व ग्राहकांना वाजवी दरात शेतमाल खरेदी करता यावा, या दुहेरी उद्देशाने राज्य शासनाने २०१५ मध्ये राज्य शेतमाल भाव समितीचे रूपांतर करून राज्य कृषी मूल्य आयोग स्थापन केला होता. पण या आयोगाचे कामकाज कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली व कृषी विद्यापीठाचे कुलगुरू, विभागप्रमुख, कृषी अर्थशास्त्र विभागप्रमुख यांच्यामार्फत कार्यरत होते. 

मुंबई : राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. या संदर्भात गुरुवारी (ता. १६) राज्य शासनाने आदेश काढले आहेत.

राज्यातील शेतमालाला किफायतशीर भाव मिळावेत व ग्राहकांना वाजवी दरात शेतमाल खरेदी करता यावा, या दुहेरी उद्देशाने राज्य शासनाने २०१५ मध्ये राज्य शेतमाल भाव समितीचे रूपांतर करून राज्य कृषी मूल्य आयोग स्थापन केला होता. पण या आयोगाचे कामकाज कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली व कृषी विद्यापीठाचे कुलगुरू, विभागप्रमुख, कृषी अर्थशास्त्र विभागप्रमुख यांच्यामार्फत कार्यरत होते. 

१ जुलै २०१७ रोजी राज्य शासनाने श्री. पटेल यांची या आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. पण गेले साडेचार महिने त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा मात्र दिला नव्हता. तरीदेखील श्री. पटेल यांनी गेल्या साडेचार महिन्यांत आपले कामकाज सुरू केले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मदतीने केंद्र शासनाकडे जाऊन त्यांनी शेतमालाला हमीभावापेक्षा अधिक भाव मिळण्याकरिता चार अधिसूचना काढण्यासाठी प्रयत्न केले. यात केंद्र शासनाने दोन लाख टनांपेक्षा जास्त तूर आयात न करण्याचा निर्णय घेतला.

आयात होणाऱ्या खाद्यतेलावर दहा टक्के आयात शुल्क आणि सोयाबीन तेलावर पाच टक्के आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेतला. मूग आणि उडीद तीन लाख टनांपेक्षा जास्त आयात न करण्याचा निर्णय घेतला. तसेच उडीद आणि मूगडाळीच्या निर्यातीवरील बंदी पूर्णपणे उठवली. तर गुरुवारीच सर्वच डाळींवरील निर्यातबंदी उठवली. या आयोगाच्या कामाचे स्वरूप लक्षात घेता शासनाने आता पटेल यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला आहे. 


इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात मुसळधारेचा अंदाजपुणे ः विदर्भ आणि तेलंगणा दरम्यान चक्राकार...
बचत गटांच्या उत्पादनांची माहिती एका...मुंबई: महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत...
पंजाब, हरियानात कृषी विधेयके...नवी दिल्लीः लोकसभेत मंजूर झालेल्या कृषी...
यांत्रिकीकरण अभियानाच्या अर्ज...पुणे:  राज्यात चालू वर्षीही कृषी...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. १९)...
राज्यात ठिकठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यात तुरळक ठिकाणी होत असलेल्या पावसाचा...
शेतीसंबंधी विधेयकाविरोधात देशव्यापी...नगर ः केंद्र सरकारने काढलेल्या व आता कायद्यात...
कृषी खात्यात आजपर्यंत कोरोनाची १८१...अकोला ः राज्यात वाढत चाललेल्या कोरोनाचा फटका कृषी...
साखर निर्यात योजनेस डिसेंबर अखेरपर्यंत...कोल्हापूर: गेल्या वर्षभरात साखर निर्यातीचे नवे...
मराठवाड्यात पूर, पावसाचे थैमाननांदेड-औरंगाबाद : परभणी व हिंगोली जिल्ह्यांत...
बंदर, सीमेवरील कांदा निर्यातीचा मार्ग...नाशिक: निर्यातबंदीमुळे मुंबईतील जेएनपीटी बंदरावर...
नाचणी, भाजीपाला लागवडीतून महिला गट झाला...गावातील ७५ टक्के जमीन कातळाची, उरलेला भाग डोंगराळ...
पीककर्ज वाटपात राज्यात कोल्हापूर प्रथम...कोल्हापूर : जिल्ह्याकरिता पीक कर्जाचे वार्षिक...
कृषी विधेयकांना वाढता विरोधनवी दिल्लीः देशभरात ठिकठिकाणी विशेषतः पंजाब आणि...
तंबी देताच फळपिकांची विमा भरपाई झाली...पुणे: फळपिक विमा योजनेतील अडवून ठेवलेली नुकसान...
कांदा उत्पादकांची सावध चाल नाशिक: केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचे धुमशान पुणे ः मराठवाड्यात पावसाचे धुमशान सुरूच आहे....
ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी निवडणूक...मुंबई: कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेल्या आणि...
हलक्या पावसाची शक्यता पुणे ः बंगाल उपसागराच्या ईशान्य परिसरात उद्या (ता...
शेतकऱ्यांना उभारी देणारी संत ज्ञानेश्‍...किनखेडा (ता.रिसोड,जि.वाशीम) येथील प्रगतशील शेतकरी...