agriculture news in Marathi pasha patel says action on future market should be taken regarding MSP Maharashtra | Agrowon

हमीभावाच्या संदर्भात वायदे बाजारावरही कारवाई हवी: पाशा पटेल

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 17 जानेवारी 2020

लातूर : हमीभावापेक्षा कमी दराने शेतीमाल खरेदी केला तर व्यापाऱ्यांवर कारवाई होते, पण वायदे बाजारात याबाबत तर काहीच होत नाही, येथेही कारवाई व्हावी, अशी मागणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे केली असल्याची माहिती राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी येथे दिली. 

लातूर : हमीभावापेक्षा कमी दराने शेतीमाल खरेदी केला तर व्यापाऱ्यांवर कारवाई होते, पण वायदे बाजारात याबाबत तर काहीच होत नाही, येथेही कारवाई व्हावी, अशी मागणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे केली असल्याची माहिती राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी येथे दिली. 

आगामी अर्थसंकल्पाच्या संदर्भात नवीदिल्लीत आयोजित बैठकीतील माहिती देण्यासाठी मंगळवारी आयोजित बैठकीत श्री. पटेल बोलत होते. ते म्हणाले, ‘‘आगामी अर्थसंकल्पासंदर्भात चर्चा करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री सीतारमण यांनी बैठक बोलावली होती. यात शेतकरी आणि पर्यावरणाच्या दृष्टीने काही सूचनाही केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या हमी भावाचा मोठा प्रश्न आहे. ||

शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळावा म्हणून केंद्र शासन चांगले पाऊल उचलत आहे. हमीभावातही वाढ केली जात आहे. हमीभाव दिला नाही तर व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल होतात, पण आजही वायदे बाजारात हमीभावापेक्षा कमी दराने शेतमालाची खरेदी केली जाते. पण येथे मात्र कारवाई होत नाही. येथेही अशी कारवाई झाली पाहिजे, अशी सूचना या वेळी करण्यात आली.’’ 

या वर्षी हरभऱ्याचा तिप्पट पेरा झाला आहे. गेल्या वर्षीचा १६ लाख टन हरभरा शिल्लक आहे. त्यामुळे देशातील हरभरा परदेशात पाठविण्यासाठी अर्थसंकल्पात योजना करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. मानव जातीच्या दृष्टीने पर्यावरणाचा धोका मोठा वाढत आहे. त्यामुळे यावर मात करण्यासाठी ‘कृषी’ तसेच ‘ॲग्रो फॉरेस्ट’साठी आकर्षक व प्रोत्साहन देणारी योजना जाहीर करावी अशी मागणी करण्यात आली आहे, असे श्री. पटेल यांनी सांगितले.

देशात १५० लाख टन खाद्यतेल आयात केले जाते. येत्या काही दिवसांत तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयात शुल्क कमी करावे अशी मागणी होऊ शकते. पण गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांचा तेलबिया पेरण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळे आयात शुल्क कमी करू नये, अशी मागणीही करण्यात आल्याचे श्री. पटेल यांनी सांगितले.

लोदग्यात `पृथ्वी रक्षण` रेडिओ
लोदग्यात लातूर जिल्ह्यातील पहिला रेडिओ सुरू करण्यात येत आहे. या रेडिओचे नाव `पृथ्वी रक्षण` असे आहे. या रेडिओची ९१.२ MHz अशी फ्रिक्वेन्सी आहे. हा कम्युनिटी रेडिओ असणार आहे. या रेडिओवर शेती व पर्यावरणाच्या संरक्षणाच्या संदर्भातच कार्यक्रम असणार आहेत. ता. २६ जानेवारी रोजी याची चाचणी घेतली जाणार आहे. सुरुवातीच्या काळात चार तास कार्यक्रम असणार आहेत. वेगवेगळ्या ॲपच्या माध्यमातून जगभरात हा रेडिओ ऐकला जाऊ शकतो. या रेडिओकरिता चारही कृषी विद्यापीठ, विविध शास्त्रज्ञ, वन विभाग, आयसीआरचे योगदान घेतले आहे, अशी माहितीही श्री. पटेल यांनी या वेळी दिली.


इतर अॅग्रो विशेष
जळगाव ः कापसाच्या खेडा खरेदीला कमी...जळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
इंडोनेशियात कच्च्या साखरेची जादा...कोल्हापूर : भारताच्या दृष्टीने साखर निर्यातीसाठी...
चांगदेव यात्रेला प्रारंभ; दिंड्या दाखलचांगदेव, जि. जळगाव ः सिद्धेश्वर योगिराज चांगदेव...
सर्व्हर डाउनच्या गोंधळामुळे द्राक्ष...नाशिक : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क...
विदर्भात पावसाला पोषक हवामान पुणे: राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...
चारशे अधिकाऱ्यांच्या कृषी विभागात...पुणे ः कृषी विभागात गेल्या दोन ते तीन दिवसांत ३९९...
परराज्यापर्यंत विस्तारला ऊसरोपे...मुखई (जि. पुणे) येथील अभिजित धुमाळ या तरुण...
केळी ‘रायपनिंग चेंबर’चा यशस्वी केला...कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसबहुल क्षेत्रात केळी...
शेतकऱ्यांवर अन्यायकारक करार नकोचअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या...
ऐच्छिक पीकविम्याचे इंगितकें द्र सरकारने पीकविमा योजना शेतकऱ्यांसाठी...
नैसर्गिक नव्हे, सेंद्रिय शेतीची धरा काससुभाष पाळेकरांच्या पद्धतीनुसार बाह्य निविष्ठा...
जलयुक्त फेल, पुढे काय?उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती...
ऊस उत्पादकता २५० टनांपर्यंत न्यावीच...पुणे : देशातील ऊस उत्पादकता एकरी शंभर टन...
कर्जमाफीसाठी आकस्मिकता निधीतून दहा हजार...मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य सरकारने...
पीकविमा हप्त्यापोटी पाचशे कोटी वितरणास...मुंबई ः पंतप्रधान पीकविमा योजना खरीप हंगाम २०१९...
मोसंबी क्लटरमध्ये शाश्‍वत उत्पादन,...औरंगाबाद : मोसंबी उत्पादकांसाठी उत्पन्नाची...
डाळिंब उत्पादनात ३० टक्के घटसांगली ः सुरुवातीला दुष्काळी परिस्थिती, त्यानंतर...
कोरोनाच्या अफवेमुळे पोल्ट्रीचे १५०...पुणे : कुक्कुट पक्षी व कुक्कुट उत्पादने यांचा...
प्रयोगशील शेतीच्या आधारे चिंचवलीने...पारंपरिक भातशेतीत बदल करून ऊसशेती व त्यास...
कहर ‘कोरोना’चाकोरोना विषाणूच्या वाढत्या उद्रेकाने जगभर दहशतीचे...