महालक्ष्मी एक्सप्रेस : प्रवाशांचे रेस्क्यु ऑपरेशन युद्ध पातळीवर सुरू

महालक्ष्मी एक्सप्रेस : प्रवाशांचे रेस्क्यु ऑपरेशन युद्ध पातळीवर सुरू
महालक्ष्मी एक्सप्रेस : प्रवाशांचे रेस्क्यु ऑपरेशन युद्ध पातळीवर सुरू

वांगणी/बदलापूर :  बदलापूर वांगणी दरम्यान गोरेगाव जवळ महालक्ष्मी एक्सप्रेस अडकली आहे. दोनही बाजूला महापूर सदृश परिस्थिती निर्माण झाली असल्याने गाडीत अडकलेल्या प्रवाशांमध्ये भीती वातावरण होते, या गाडीमधील ६००च्यावर प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. एनडीआरएफ आणि स्थानिक मदत कार्य सुरू आहे. काल सायंकाळी साडेआठपासून प्रवासी अडकले होते.

६०० हुन अधिक प्रवाशांना बाहेर काढले, सह्याद्री मंगल कार्यालय आणि सुरक्षित स्थळी हालविले आहे. ३७ डॉक्टर उपलब्ध असून, प्रवाशांना फूड पॅकेट दिले आहेत. महालक्ष्मी एक्सप्रेस मध्ये ९ गर्भवती महिला होत्या त्यांना सुखरूप हालविले, १ महिलेला रुग्णालयात दाखल केले आहे. बाहेर काढण्यात आलेल्या लोकांना इच्छित स्थळी पोचविण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. महालक्ष्मी एक्सप्रेसमधील प्रवाशांची सुटकेसाठी प्रयत्न सुरु, पहा Video

दरम्यान, प्रवाशांच्या बचावासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी, महापालिकांचे आयुक्त,स्थानिक प्रशासन यांच्याशी बोलून मदत रवाना करण्यात आली आहे. एनडीआरएफ, टीडीआरएफ यांच्या टीम देखील पोहोचल्या आहेत.मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. मुख्यमंत्र्यांनी वायू दलाचे हेलिकॉप्टर रवाना केले आहेत. बोट,रोपवे, हेलिकॉप्टरच्या मदतीने बचावकार्य सुरू असल्याची माहिती ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

महालक्ष्मी एक्सप्रेसमधील प्रवाशांना कोल्हापूरपर्यंत सुखरूप पोहोचवणार आहोत. बदलापूर स्थानकातून कोल्हापूर पर्यंत जाणाऱ्या दुसऱ्या ट्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. महालक्ष्मी एक्सप्रेसमधील प्रवाशांच्या सुटकेसाठी एनडीआरएफची ४० जणांची टीम आणि २ हेलिकॉप्टर पोहोचले आहेत.त्यांच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे. प्रवाश्यांनी घाबरू नये असं आवाहन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com