शेतीसाठी पाटोदा ग्रामपंचायत देणार ट्रॅक्‍टरचलित औजारे !

ग्रामपंचायतीने कृषी औजारे बॅंक सुरू करून गावातील कर भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी माफक दरात शेतीकामासाठीची औजारे उपलब्ध करून देण्याची सोय केली आहे. त्याचा शेतकरी निश्‍चित लाभ घेतील व ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाला सहकार्य करतील. - भास्करराव पेरे, सरपंच, पाटोदा, जि. औरंगाबाद.
ट्रॅक्टर
ट्रॅक्टर

वाळूज, जि. औरंगाबाद ः ग्रामपंचायतीचा कर भरणाऱ्यांना शेतीकामे करण्यासाठी माफक दरात ट्रॅक्‍टर देण्याचा उपक्रम वाळूज परिसरातील आदर्श ग्रामपंचायत पाटोदाने केला आहे. विषेश म्हणजे बाजारभावापेक्षा ५० टक्‍के कमी दराने शेतीकामे करून दिली जाणार असल्याची माहिती पाटोदाचे सरपंच भास्करराव पेरे यांनी यांनी दिली.  ग्रामपंचायत पाटोदा, गंगापूर (नेहरी) ग्रामपंचायतीने कर भरणाऱ्या गावकऱ्यांना शेतीकामात माफक दरात कृषी औजारे उपलब्ध व्हावी म्हणून जिल्हा परिषद, पंचायत समिती व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी औजारे बॅंक घेतली. त्यामधून ट्रॅक्‍टर व रोटावेटर खरेदी करत त्याचे उद्‌घाटन नववर्षाच्या पहिल्या दिवशी बुधवारी (ता. १) केले. उर्वरित लागणारी औजारे ग्रामपंचायत लवकरच खरेदी करेल, असे पेरे म्हणाले. या कृषी औजारे बॅंकसाठी पाटोदा ग्रामपंचायतीने ट्रॅक्‍टर खरेदीसाठी जिल्हा ग्रामविकास निधीतून १० लाख रुपये कर्ज घेतले असून ४ लाख रुपयांचे अनुदान कृषी विभागामार्फत औजारे बॅंक योजनेतून मिळाली. उर्वरित रक्कम ग्रामपंचायत पाटोदाने टाकून ट्रॅक्‍टर खरेदी केले. नववर्षाच्या पहिल्या दिवशी बुधवारी (ता. १) या ट्रॅक्‍टरचे उद्‌घाटन करण्यात आले.  या वेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनील भोकरे, गटविकास अधिकारी एम. सी. राठोड, उपविभागीय कृषी अधिकारी अनिल हादगावकर, तालुका कृषी अधिकारी विश्वास जाधव, कृषी पर्यवेक्षक कमलाकर पेरे उपस्थित होते. उद्‌घाटनाच्या दिवशीच गावातील करभरणा केलेल्या आण्णासाहेब गणपत पेरे यांनी ट्रॅक्‍टर मशागतीची फी भरून खऱ्या अर्थाने उद्‌घाटन केले. त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला; सरपंच भास्करराव पेरे, उपसरपंच विष्णू राऊत, ग्रामविकास अधिकारी पी. एस. पाटील, माजी सरपंच कल्याण पेरे, ग्रामपंचायत सदस्य पुष्पाताई पेरे, किशोर पेरे, संगीता जमधडे, वर्षा भाग्यवंत, मीरा पवार, कुसुम मातकर, पूनम गाडेकर, गणेश मुचक, लहू मुचक, भाऊसाहेब मुचक, परसराम मुचक, दिलीप जमधडे, सोमीनाथ पेरे, लक्ष्मण मुचक, जनार्दन मुचक, मच्छिंद्र जमधडे, रुस्तुम मुचक, बाळू मुचक, भागचंद दगडू पेरे, संजय सोनवणे, दीपाली पेरे, भाग्यश्री देवडे, मीना बनसोडे, रवींद्र जाधव आदींची या वेळी उपस्थिती होती.  प्रतिक्रिया कृषी औजारे बॅंक ग्रामपंचायत पाटोदाने घेऊन चांगला उपक्रम हाती घेतला आहे. त्याचा शेतकऱ्यांना माफक दरात मशागतीची औजारे मिळण्यासाठी उपयोग होईल.  - विश्वास जाधव, तालुका कृषी अधिकारी, औरंगाबाद. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com