यवतमाळ जिल्ह्यातील पांदण रस्ते पूर्ण करणार : राठोड

यवतमाळ : ‘‘‘पालकमंत्री पांदणरस्ते’ योजनेंतर्गत जिल्ह्यात मिशन मोडवर काम करून सर्व पांदण रस्ते टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येतील. तसा निर्णय जिल्हास्तरीय समितीमध्ये घेण्यात आला आहे’’, असे वने, भुकंप पुनर्वसन मंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
To pave roads in Yavatmal district: Rathod
To pave roads in Yavatmal district: Rathod

यवतमाळ  : ‘‘‘पालकमंत्री पांदणरस्ते’ योजनेंतर्गत जिल्ह्यात मिशन मोडवर काम करून सर्व पांदण रस्ते टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येतील. तसा निर्णय जिल्हास्तरीय समितीमध्ये घेण्यात आला आहे’’, असे वने, भुकंप पुनर्वसन मंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात पांदण रस्त्यांबाबत जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. आमदार आशिष जयस्वाल, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कुळकर्णी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद गुडधे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) संगिता राठोड, विशेष कार्य अधिकारी रवींद्र पवार आदी उपस्थित होते.

राठोड म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील पांदण रस्त्यांसाठी नियोजन समितीमधून निधी देण्यात आला आहे. गावागावातील शेतशिवार रस्त्यांने जोडली गेली, तर शेतकऱ्यांचा फायदा होईल. शेतमालाची वाहतूक सोपी होईल. शेतकऱ्यांसाठी महत्वाचा असलेला पांदण रस्त्यांचा विषय प्रशासनाने प्राधान्याने हाती घ्यावा. योग्य नियोजन करून येत्या दिवाळीपासून मार्चपर्यंत जिल्ह्यात किमान १००० किमीचे पांदण रस्ते तयार करावे. ग्रामपंचायतींनी आपले ठराव तालुकास्तरीय यंत्रणेकडे त्वरीत सादर करावे. निधीची उपलब्धता पाहून टप्प्याटप्प्याने हे रस्ते पूर्ण करण्यात येतील.’’ 

‘‘जिल्ह्यातील अंदाजे १० हजार पांदण रस्त्यांसाठी १४ वा वित्त आयोग, जिल्हा नियोजन समिती, जि.प.शेष फंड, रोहयो, जनसुविधा तसेच मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये नागरीसुविधा फंड, ठक्करबाप्पा, खनिज विकास निधी आदी बाबींतून निधी देण्याचे नियोजन प्रशासनाने करावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. तत्पूर्वी पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘नो मास्क नो एन्ट्री’ आणि ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ बॅचचे विमोचन करण्यात आले.

आमदार जयस्वाल म्हणाले, ‘‘पांदण रस्ते ही योजना नसून कार्यपध्दती आहे. अतिशय कमी खर्चात गावागावातील रस्ते पूर्ण झाल्यास शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल. यंत्रणेने शासन निर्णयानुसार आराखडे तयार करावे. जेसीबी, पोकलँडबाबत निविदा प्रक्रिया त्वरित पूर्ण करून नवीन दर मागावून घ्यावे. विशेष म्हणजे रोलर, जेसीबी, पोकलँड स्व:मालकीची असणाऱ्या व काम करण्यात स्वारस्य असणाऱ्यांना कामे द्यावीत. ’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com