आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा भुजबळ यांना पवारांचा सल्ला

आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा भुजबळ यांना पवारांचा सल्ला
आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा भुजबळ यांना पवारांचा सल्ला

मुंबई : जामिनावर सुटलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शुक्रवारी (ता. ११) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या वेळी आरोग्याची विशेष काळजी घ्या, असा सल्ला पवार यांनी भुजबळ यांना दिला. भुजबळ सकाळी आपल्या सांताक्रूझमधील निवासस्थानावरून शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले. या भेटीत राजकीय नाही तर प्रकृतीसंदर्भात चर्चा झाली. शरद पवार यांनी वडीलकीच्या नात्याने आपली विचारपूस केली. शिवाय, विशेष काळजी घ्या, असेही पवारांनी सांगितल्याचे भुजबळ म्हणाले. दरम्यान, महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणात जामीन मिळाल्याची माहिती माझ्या निकटवर्तीयांनी दिल्यानंतर मला सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा पहिला फोन आल्याची माहिती, छगन भुजबळ यांनी दिली होती. छगन भुजबळ यांना गुरुवारी (ता. १०) केईएम रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी दोन वर्षे तुरुंगवास भोगलेले राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना नुकताच जामीन मंजूर झाला आहे. या वेळी भुजबळ म्हणाले होते की, ''मला डॉक्टरांनी आराम करण्याच्या अटीवर डिस्चार्ज दिला आहे. लवकरच मी उपचार करून पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमांना हजर राहणार आहे. जामीन मिळाल्याची माहिती मिळाल्यानंतर मला पहिला फोन पवारसाहेबांचा आला. सत्य सर्वांसमोर येईल, ज्यामुळे मला तुरुंगवास झाला. त्या महाराष्ट्र सदनाचा सर्वजण लाभ घेत आहेत, याचा मला आनंद आहे.''

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com