नगरमध्ये राष्ट्रवादीविरुद्ध विखेंचा राहणार उघड संघर्ष

नगरमध्ये राष्ट्रवादीविरुद्ध विखेंचा राहणार उघड संघर्ष
नगरमध्ये राष्ट्रवादीविरुद्ध विखेंचा राहणार उघड संघर्ष

नगर ः नगर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडून डॉ. सुजय विखे यांना उमेदवारी मिळणार हे स्पष्ट झाले आहे. राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार अजून ठरलेला नाही. मात्र गेल्या चार दिवसांत झालेल्या घडामोडी पाहता आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी ‘‘राष्ट्रवादीचा प्रचार करणार नाही’’ असे जाहीरपणे स्पष्ट केल्याने विखे यांचा आता लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीसोबत उघड संघर्ष होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.  नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असून तो कॉंग्रेसला दिला गेला नाही. त्यामुळे येथून लढण्यासाठी गेल्या तीन वर्षापासून तयारीत असलेले डॉ. सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश करून कमळ हाती धरले आहे. त्यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते असून विधानसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. सुजय यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर झालेल्या टीकाटीप्पनीनंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनीही आपली भूमिका स्पष्ट करत शरद पवार यांनी स्व. बाळासाहेब विखे पाटील यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याविषयी नाराजी व्यक्त केली.  राज्यात भाजप सरकारला टक्कर देण्यासाठी आणि त्यांना हरवण्यासाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी आहे. मात्र नगरच्या जागेवरून मोठ्या प्रमाणात मतभेद ताणले गेले आहेत. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार लढणार आहे. अजून उमेदवार निश्चित झाला नाही. मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांनी ‘‘मी नगरमध्ये राष्ट्रवादीचा प्रचार करणार नाही’’ हे जाहीरपणे स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रवादी व कॉंग्रेसची आघाडी असली तरी नगरमध्ये मात्र कॉंगेस नेते विखे यांचा राष्र्टवादीसोबत उघडपणे संघर्ष राहणार असल्याचे दिसून येत आहे. विखे परिवाराची शिर्डी लोकसभा मतदारसंघात प्रचंड ताकद आहे. शिर्डी लोकसभेची जागा कॉंग्रेसकडे आहे. मात्र सुजय यांनी प्रवेश घेतानाच नगरसह शिर्डी जिंकणार असल्याचे नेत्यांसमोर जाहीरपणे सांगितलेले आहे. शिवाय शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे विखेंची शिर्डी मतदार संघाबाबतची भूमिकाही महत्त्वाची राहणार आहे. मात्र गेल्या आठ दिवसांत झालेल्या राजकीय घडामोडीचा विचार करता विखे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते असले तरी निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादीसोबत उघड संघर्ष होणार हे स्पष्ट झाले आहे.  एकाच वेळी दुहेरी संघर्ष  नगर जिल्ह्याच्या राजकारणात विखे, थोरात ही मोठी नावे आहेत. उच्चशिक्षित असून मला माझा निर्णय घेण्याचा अधिकार आहे, असे स्पष्ट करत डॉ. सुजय विखे पाटील यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला. त्यानंतर पक्षातील नेते बाळासाहेब थोरात यांनी विखे यांच्यावर निशाना साधला. त्यावरून विखे-थोरातांनी एकमेकांवर टीका केली. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांचा राष्ट्रवादीसोबत तर पक्षांतर्गत थोरातांसोबतही संघर्ष सुरू असल्याचे दिसत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com