सध्याचे सरकार म्हणजे लबाडाचे आवतन : पवार

सध्याचे सरकार म्हणजे लबाडाचे आवतन : पवार
सध्याचे सरकार म्हणजे लबाडाचे आवतन : पवार

नगर : सध्याचे केंद्र सरकार म्हणजे लबाडाचे आवतन आहे. ते स्वीकारायचे नसते. कर्जातून मुक्त होत शेतीमालाला योग्य भाव मिळाला, तर शेतकऱ्यांची परिस्थिती बदलून ते सक्षम होतील. त्यामुळे शेतकऱ्यांचे सरकार येण्यासाठी आघाडीचे जास्तीत जास्त खासदार संसदेत पाठविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.  नगर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी कर्जत येथे गुरुवारी सभा झाली. आमदार बाळासाहेब थोरात, युवा नेते रोहित पवार, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मंजूषा गुंड या वेळी उपस्थित होते.  या वेळी श्री. पवार म्हणाले, की नरेंद्र मोदी यांचे सरकार हुकूमशाहीचे आहे. लोकशाही राजकीय नेते अथवा पुढाऱ्यांनी नव्हे, तर लोकांनी सक्षम केली आहे. लोकाभिमुख सरकार आणि जनतेची जाण असणारे त्यागी म्हणून नेहरू-गांधी घराण्याचे उपकार विसरून चालणार नाहीत. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी संभाषणक्रांतीची मुहूर्तमेढ रोवली. मोदींकडे दूरदृष्टी नाही. त्यांनी सहकार, शेती आणि उद्योग मोडीत काढले आहेत. फसवी आणि खोटी स्वप्ने दाखवून ते सत्तेत आले; मात्र सध्या जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. मोदी लाट ओसरली आहे, हे नुकत्याच झालेल्या तीन राज्यांतील निवडणुकांच्या निकालावरून स्पष्ट होते.  बाळासाहेब थोरात म्हणाले, की आघाडी सरकारच्या काळात श्री. पवार यांनी कृषी क्षेत्रात चैतन्य आणले; मात्र सध्या राज्याला कृषिमंत्रीच नाही. पक्षाच्या लेबलवर जनावरांची छावणी मंजूर केली जाते. आम्ही जनावरे जगवली, तर ते कार्यकर्ते पोसत आहेत. ज्यांना पवार यांच्या कृपेने विरोधी पक्षनेतेपद मिळाले, ते पुत्रहट्टापायी सारे विसरले. त्यांनी राजकारणाचा पोरखेळ केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com