‘डॉक्‍टर ऑफ सायन्स’ पदवीने पवार, गडकरी यांचा सन्मान

महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार व केंद्रीय रस्ते वाहतूक विकासमंत्री नितीन गडकरी यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवी देण्यात आली आहे.
Pawar, Gadkari honored with 'Doctor of Science' degree
Pawar, Gadkari honored with 'Doctor of Science' degree

नगर ः महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार व केंद्रीय रस्ते वाहतूक विकासमंत्री नितीन गडकरी यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवी देण्यात आली आहे. गुरुवारी (ता. २८) झालेल्या ३५ व्या पदवीदान समारंभात कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पवार व गडकरी यांचा गौरव करण्यात आला. 

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात आज राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्या अध्यक्षतेखाली ३५ वा पदवीदान समारंभ झाला. कृषिमंत्री दादा भुसे, जयपूर येथील महाराणा प्रताप कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू नरेंद्रसिंह राठोड, ऊर्जाराज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाचे कुलगुरू दापोलीचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, परभणीच्या मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. शरद गडाख यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकार, विद्यापीठातील अधिकारी, कार्यकारी परिषदेचे सदस्य उपस्थित होते. 

यंदा विविध शाखांतून पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांसह खासदार शरद पवार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवी देण्यात आली आहे. राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते पवार व गडकरी यांचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.

पवार, गडकरी देशातील हिरे ः कोश्‍यारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या वेळी शरद पवार व नितीन गडकरी यांचे भरभरून कौतुक केले. कोश्यारी म्हणाले, ‘‘शरद पवार आणि नितीन गडकरी देशातील हिरे आहेत. शेती विकासासाठी पवार यांचे मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. दोघांनीही देशासाठी, समाजासाठी मोठे योगदान दिले आहे.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com