टँकर, रोजगार हमी कामाच्या उपलब्धतेकडे लक्ष द्या ः सहकारमंत्री

टँकर, रोजगार हमी कामाच्या उपलब्धतेकडे लक्ष द्या ः सहकारमंत्री
टँकर, रोजगार हमी कामाच्या उपलब्धतेकडे लक्ष द्या ः सहकारमंत्री

सोलापूर : जनावरांच्या चारा-पाण्याबरोबरच लोकांना पिण्याच्या पाण्याची तसेच रोजगाराची समस्या आहे. मागणीप्रमाणे तातडीने टँकर आणि रोजगार हमीची कामे उपलब्ध करा, अशी सूचना सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी रविवारी (ता. २६) येथे बैठकीत दिली.  

दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्यांतील गावातील जनावरांच्या चारा, पाणी, छावण्या, टँकर मागणी, रोजगार हमीची कामे याबाबत सहकारमंत्री देशमुख यांनी तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी, अधिकारी, ग्रामसेवक यांच्या समवेत दुष्काळी आढावा बैठक घेऊन याबाबतच्या उपाययोजनांबाबत चर्चा केली. त्या वेळी त्यांनी ही सूचना केली. 

जिल्हा नियोजन भवन, सोलापूर येथे झालेल्या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, प्रांताधिकारी ज्योती पाटील, दक्षिण सोलापूर तहसीलदार रमा जोशी, उत्तर सोलापूर तहसीलदार जयवंत पाटील, दक्षिण सोलापूर पंचायत समिती गटविकास अधिकारी प्रशांत सिंह मरोड, उत्तर सोलापूर पंचायत समिती गटविकास अधिकारी रंजना कांबळे, जि. प. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे श्री. चव्हाण, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार आदी उपस्थित होते.

सहकारमंत्री देशमुख म्हणाले, ‘‘पिण्याचे पाणी, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे, त्यासाठी ज्या गावांना चारा छावण्या उभारावयाच्या असतील, तर त्या गावांनी छावणीसाठीचे प्रस्ताव विनाविलंब सादर करावेत. तसेच गावातील लोकवस्ती व जनावरांसह पिण्याच्या पाण्याचे नियोजन करून त्याप्रमाणे पाण्याचा साठ्याचा स्रोत पाहून विहिरी अधिग्रहण करण्यासाठीचेही प्रस्ताव सादर करावेत. तसेच गावात पाण्याचा स्रोत उपलब्ध नसेल तर त्यांनी पिण्याच्या पाण्याच्या टँकर मागणीचा प्रस्ताव सादर करावा, टँकर मागणीच्या प्रस्तावावर तात्काळ कार्यवाही करून टँकर सुरू करणेबाबत अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. ज्या गावात एमआरईजीएसअंतर्गत कामे प्रस्तावित आहेत, त्यांना ती मंजुरी देऊन त्या गावातील लोकांना एमआरजीईएस योजनेंतर्गत मजुरांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी प्राधान्याने काम करावे.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com