किरकोळ आजारांकडे नको दूर्लक्ष

महिलांनी घराकडून शेताकडे जाताना चेहऱ्यावर पदर गुंडाळावा किंवा मास्कचा वापर करावा. महिलांनी शेतात जाताना घोळक्याने न जाता रस्त्याचा डाव्या बाजूने एका रांगेमध्ये दोन व्यक्तीतील सहा फुटाचे अंतर ठेऊनच चालावे.
Keep a distance of at least six feet between two people while working on the farm
Keep a distance of at least six feet between two people while working on the farm

महिलांनी घराकडून शेताकडे जाताना चेहऱ्यावर पदर गुंडाळावा किंवा मास्कचा वापर करावा. महिलांनी शेतात जाताना घोळक्याने न जाता रस्त्याचा डाव्या बाजूने एका रांगेमध्ये दोन व्यक्तीतील सहा फुटाचे अंतर ठेऊनच चालावे.

सध्याच्या करोनाच्या साथीमध्येही शेतकरी आणि विशेषतः महिला वर्ग शेती कामामध्ये गुंतलेला आहे. शेती नियोजनाच्या दैनंदिन कामामध्ये स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

  • महिलांनी घराकडून शेताकडे जाताना चेहऱ्यावर पदर गुंडाळावा किंवा मास्कचा वापर करावा. महिलांनी शेतात जाताना घोळक्याने न जाता रस्त्याचा डाव्या बाजूने एका रांगेमध्ये दोन व्यक्तीतील सहा फुटाचे अंतर ठेऊनच चालावे.
  • ट्रॅक्टर, बैलगाडी इत्यादी वाहनांचा प्रवासासाठी वापर करीत असताना सामाजिक अंतराचे भान ठेवावे.
  • शेतात गेल्यानंतर काम सुरु करण्यापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवावेत. शेतात काम करताना दोन व्यक्ती मधील अंतर किमान सहा फुटाचे ठेवावे.
  • शेतात जेवण करण्यापूर्वी हात, पाय स्वच्छ धुवावेत. सद्याच्या परिस्थितीत एकत्र जेवण करण्यासाठी बसू नये, बसल्यास अंतर ठेवूनच बसावे.
  • चेहऱ्यावर मास्क ठेवूनच शेतात काम करावे. चेहऱ्यावरील मास्कला वारंवार हात लावू नका. घाम पुसण्यासाठी स्वच्छ सुती कापडाचा वापर करावा.
  • शेतीकामात वापरीत असलेल्या सर्व वस्तू आणि अवजारे स्वच्छ व कोरडीकरून ठेवावीत.
  • शेतातून घरी गेल्यावर सर्वप्रथम आंघोळ करावी. शेतात वापरलेले कपडे बाजूला ठेवून रोज साबणाने धुवावेत.
  • कुटुंबातील सर्वांनी आणि विशेषतः: महिलांनी रोज सकस समतोल आहार घ्यावा. दिवसभर भरपूर पाणी प्यावे, शक्यतो कोमट पाणी प्यावे.
  • रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याच्या दृष्टीने आहारामध्ये संत्री, मोसंबी, लिंबू, डाळिंब असावे. घरचे दूध असल्यास नियमित घ्यावे, त्याचे प्रमाण वाढवावे.
  • चहा करताना त्यात तुळस, हळद, आले, मिरी, लवंग, दालचिनी, गवती चहाचा वापर करावा. असा चहा दिवसातून तीन,चार वेळा गरम घेतल्यास घसा चांगला राहतो.
  • सर्दी, खोकला, अंगदुखी सारख्या शारीरिक समस्या किरकोळ म्हणून सोडू नका. सद्याचे गांभीर्य जाणून ताबडतोब डॉक्टरांकडून तपासणी करावी.
  • संपर्क - सौ. अर्चना देशमुख,९४०३७७४६९८ ( विषय विशेषज्ञ, गृह विज्ञान, कृषी विज्ञान केंद्र, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,नाशिक)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com