Agriculture news in marathi pay to Bhima workers till March 5: Tehsildar Bansode | Agrowon

‘भीमा’च्या कामगारांचे पैसे पाच मार्चपर्यंत देणार : तहसीलदार बनसोडे

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 27 फेब्रुवारी 2020

मोहोळ, जि. सोलापूर : कामगारांच्या खात्यावर ५ मार्चपर्यंत अडीच कोटी रुपये जमा करावयाचे व उर्वरित रक्कम १५ एप्रिलपर्यंत द्यावयाची, असे लेखी पत्र कारखाना प्रशासनाच्या वतीने तहसीलदार जीवन बनसोडे यांच्यामार्फत कामगार प्रतिनिधींना देण्यात आले. परिणामी, टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचे विविध मागण्यांसाठी गेल्या १६ दिवसांपासून तहसील कार्यालयासमोर सुरू असलेले उपोषण मंगळवारी (ता.२५) मागे घेण्यात आले. 

मोहोळ, जि. सोलापूर : कामगारांच्या खात्यावर ५ मार्चपर्यंत अडीच कोटी रुपये जमा करावयाचे व उर्वरित रक्कम १५ एप्रिलपर्यंत द्यावयाची, असे लेखी पत्र कारखाना प्रशासनाच्या वतीने तहसीलदार जीवन बनसोडे यांच्यामार्फत कामगार प्रतिनिधींना देण्यात आले. परिणामी, टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचे विविध मागण्यांसाठी गेल्या १६ दिवसांपासून तहसील कार्यालयासमोर सुरू असलेले उपोषण मंगळवारी (ता.२५) मागे घेण्यात आले. 

भीमा कारखाना गेल्या दोन वर्षांच्या दुष्काळामुळे आर्थिक अडचणीत आला आहे. त्यातच विस्तारीकरण व सहवीज निर्मिती प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. दरम्यान, या सर्व घडामोडींत कामगारांचा पगार, निवृत्तिवेतन व शेतकऱ्यांच्या उसाची एफआरपीची रक्कम थकली. कामगारांनी १६ दिवसांपासून थकीत वेतनासह विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू केले.

उपोषणकर्त्यांची कारखान्याचे माजी अध्यक्ष सुधाकर परिचारक, माजी आमदार राजन पाटील यांनी भेट घेतली. कामगारांना कारखान्याच्या अडचणीबाबत सांगितले. . प्रांताधिकारी सचिन ढोले यांनीही बैठक घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला; मात्र कामगार आपल्या निर्णयावर ठाम राहिले.

बैठकीत निघाला तोडगा 

दरम्यान, मंगळवारी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी त्यांच्या दालनात कारखान्याचे उपाध्यक्ष सतीश जगताप, कार्यकारी संचालक सूर्यकांत शिंदे, तहसीलदार जीवन बनसोडे व कामगार प्रतिनिधींची बैठक आयोजित केली. या बैठकीत चर्चा होईल पैसे जमा करण्याचे ठरले. या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश काळे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख अशोक भोसले, राष्ट्रवादीचे पक्षनेते ज्ञानेश्‍वर चव्हाण, दत्ता म्हस्के, दीपक भोसले व कामगार उपस्थित होते.


इतर ताज्या घडामोडी
नगरला भाजी खरेदीसाठी पुन्हा लोकांची...नगर ः भाजी खरेदीसाठी लोक गर्दी करीत असल्यामुळे...
घनसावंगी तालुक्यात गारपीटीचा पुन्हा...घनसावंगी, जि.जालना : कोरोना संसर्गामुळे बंदने...
अकोला : शेतमालाची नोंदणी कृषी विभागाकडे...अकोला  ः ‘कोरोना’मुळे सर्वत्र संचारबंदी लागू...
पंढरपूर भागात ऐन बहरातील शेवग्याला कोयताकरकंब, जि. सोलापूर ः ‘कोरोना’मुळे सर्वच...
हिंगोलीत वाहन परवान्यासाठी स्वतंत्र कक्षहिंगोली ः राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये...
नगर : काही ठिकाणी 'खासगी'कडून दूध...नगर  ः कोरोना विषाणू संसर्गाच्या...
सोलापुरात `फोन करा अन किराणा माल,...सोलापूर : कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी...
अकोल्यात भाजीपाला विक्रीसाठी...अकोला ः गेल्या काही दिवसांपासून ‘कोरोना’...
विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३...
परभणी शासकीय दुग्धशाळेत दूध संकलनात वाढपरभणी ः ‘कोरोना’ विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...
जळगावातून उत्तर भारताकरिता केळीची...जळगाव  ः जिल्ह्यातून केळीची उत्तर भारतासह...
कऱ्हाडमध्ये मिळतोय घरपोच भाजीपाला  कऱ्हाड, जि.सातारा  :  कऱ्हाड शहरातील...
जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवा...सोलापूर : ‘कोरोना’ विषाणूंच्या प्रार्दुभावाला...
सोलापूरात ‘कोरोना’बाबत माहितीसाठी...सोलापूर : ‘कोरोना’ विषाणूच्या प्रतिबंधासाठी...
सोशल मीडियाच्या मदतीने ढोबळी मिरचीची...जळगाव ः कोरोना विषाणूच्या संकटामुळे परराज्यातील...
खुद्द पंतप्रधानांनी साधला नायडू...पुणे : ‘‘तुम्ही स्वतःची नीट काळजी घेत आहात ना,...
निफाडमध्ये पावसाच्या तडाख्यात...नाशिक : चालू वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे...
औरंगाबादेत शेतकरी गटांची फळे, धान्य...औरंगाबाद : जिल्ह्यातील जवळपास चाळीस गावांतील...
अकोला ः केळी उत्पादकांसाठी मार्ग काढा;...अकोला ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...
तयार बेदाणा बॉक्स नसल्याने ठेवायचा कोठे...सांगली : जिल्ह्यात बेदाणा उत्पादन अंतिम टप्प्यात...