`नाशिक जिल्ह्यात मक्याची देयके त्वरित अदा करा`

नाशिक : खरेदी सुरू होऊन दोन महिने उलटून गेले. खरेदी केलेल्या मक्याची देयके प्रलंबित आहेत. ती त्वरित अदा करा, अशी मागणी शेतकरी, शेतकरी संघटना व लोकप्रतिनिधींनी केली.
 Pay bill of maize in Nashik district immediately
Pay bill of maize in Nashik district immediately

नाशिक  : केंद्र सरकारच्या आधारभूत धान्य खरेदी योजना अंतर्गत जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून मका खरेदी झाली. मात्र, खरेदी सुरू होऊन दोन महिने उलटून गेले. खरेदी केलेल्या मक्याची देयके प्रलंबित आहेत. ती त्वरित अदा करा, अशी मागणी शेतकरी, शेतकरी संघटना व लोकप्रतिनिधींनी केली.

केंद्र सरकारने आधारभूत खरेदी योजनेतून हमीभावाने मका व ज्वारी खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर केंद्र व राज्य सरकारे मिळून अनेक अडथळे पार करत मका खरेदी केली. मात्र, विक्री होऊनही पैसे न मिळल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. 

अगोदर खरेदी पूर्ण करण्यासाठी दोन वेळा खरेदीची क्षमता वाढवून दिली. त्यामुळे जास्तीत जास्त हमीभावाने मका खरेदी करण्यास मुभा मिळाली होती. मात्र आता अडीच महिने उलटून ही मक्याची देयके अदा न झाल्याने शेकडो मका उत्पादक हवालदिल झाले आहेत. ते शासकीय अधिकाऱ्यांना फोनद्धारे संपर्क साधत आहेत. त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने शेतकरी वैतागले आहेत.

राज्य सरकारकडे खरेदी मर्यादा वाढविण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला. मात्र, खरेदी झाली. मात्रा आता देयके प्रलंबित आहेत. ती मिळण्यासाठी खासदार डॉ. भारती पवार यांनी अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ व केंद्रीय खाद्य व सार्वजनिक वितरण विभाग मंत्रालय नवी दिल्ली यांना पत्राद्वारे विनंती केली.

आंदोलनाचा इशारा 

दीड महिन्यात नविन मका बाजारात उपलब्ध होईल. त्यामुळे मागील वर्षाच्या पिकांचे पैसे मिळाले नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे वेळेवर पैसे न दिल्यास आंदोलन छेडले जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटना, शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

हमीभावाने खरेदी केलेल्या मक्याची रक्कम खात्यावर वर्ग झाली नाही. त्यामुळे मका उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर मका खरेदीची देय असलेली रक्कम लवकरात लवकर वर्ग करून त्यांना दिलासा द्यावा, अन्यथा आंदोलन करावे लागेल.

- बाळासाहेब शेवाळे, तालुकाध्यक्ष, शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना, कळवण तालुका

केंद्र व राज्य शासनाने खरेदी केलेल्या मक्याचे पेंमट त्वरित अदा करा. अन्यथा, जिल्ह्यातील खरेदी केंद्रे होती, तिथे तिर्व आंदोलन करण्यात येईल. - कुबेर जाधव, समन्वयक, स्वाभिमानी शेतकरी संघटना.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com