नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून (पोकरा) संरक्षित शेतीत वापरल्या जात असलेल्या अनेक घटकांना
ताज्या घडामोडी
पीकविमा हप्ता २७ नोव्हेंबरपूर्वीच भरा : सावंत
सिंधुदुर्ग : बदलत्या वातावरणामुळे जिल्ह्यातील आंबा, काजू पिकांना विमा संरक्षण आवश्यक आहे. पीक विमा हप्ता भरण्याची मुदत ३० नोव्हेंबर असली, तर तीन दिवस कार्यालयांना सुट्टी आहे.
सिंधुदुर्ग : बदलत्या वातावरणामुळे जिल्ह्यातील आंबा, काजू पिकांना विमा संरक्षण आवश्यक आहे. पीक विमा हप्ता भरण्याची मुदत ३० नोव्हेंबर असली, तर तीन दिवस कार्यालयांना सुट्टी आहे. त्यामुळे २७ नोव्हेंबरपूर्वीच शेतकऱ्यांनी पीक विमा हप्ता भरावा, असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले.
सावंत म्हणाले, ‘‘विमा योजनेत कोकणातील आंबा आणि काजू या दोन फळपिकांचा समावेश आहे. या दोन्ही पिकांना विमा संरक्षण असल्यामुळे गेल्या चार वर्षांत हवामान बदलामुळे झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना काही अंशी मदत झाली. राज्य शासनाने ५ जून २०२० रोजी चालु वर्षासाठी फळपीक विमा योजना जाहीर केली आहे. यामध्ये काही निकषात बदल केले आहेत. हे बदल आंबा आणि काजू बागायतदारांसाठी अन्यायकारक आहेत. त्यात बदल करण्यासाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची भेट घेतली.’’
‘‘सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती दिली. त्यानुसार या योजनेच्या काही निविदा रद्द करण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे विनंती केली आहे. मात्र, त्याला अद्याप मान्यता मिळालेली नाही.
सध्याची विमा योजना शेतकऱ्यांसाठी अडचणीची आहे. आंबा पिकांसाठी १ एप्रिल ते १५ मे या कालावधीत २५ मि.मी पेक्षा अधिक पाऊस झाल्यास आणि १ मार्च ते १५ मे पर्यंत ३७ डिग्री से.पेक्षा अधिक तापमान राहिल्यास विमा परताव्यास बागायतदार पात्र ठरण्याचा निकष आहे. त्यामुळे राज्य शासन स्वतंत्र विमा निकष योजना राबविण्याच्या विचारात आहे.
विमा हप्ता भरण्याची मुदत ३० नोव्हेंबर आहे. परंतु, तत्पूर्वीच तीन दिवस कार्यालयांना सुट्टी असल्यामुळे शेतकऱ्यांना विमा हप्ता भरताना अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी २७ नोव्हेंबरपूर्वीच विमा हप्ता भरावा, असे आवाहन सावंत यांनी केले.
जीपीएस मॅपवर छायाचित्र
यावर्षी फळपीक विमा शेतकऱ्यांसाठी जीपीएस मॅपवर बागेत काढलेले छायाचित्र सक्तीचे करण्यात आले आहे. अनेक शेतकरी या निकषांपासून अनभज्ञ असल्यामुळे बागायतदारांची अखेरच्या क्षणी धावपळ सुरू आहे.
- 1 of 1023
- ››