Agriculture news in marathi Pay the difference to the farmers under the price Bhawantar scheme | Agrowon

भावांतर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फरकाची रक्कम द्या 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 6 मे 2020

अकोला ः खासगी व्यापाऱ्यांना कापूस विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना भावांतर योजनेअंतर्गत हमीभाव किमतीच्या फरकाची रक्कम द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. ‘लॉकडाउन’मुळे राज्य सहकारी कापूस उत्पादक महासंघ (फेडरेशन) आणि भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) यांची कापूस खरेदी तब्बल महिनाभरापासून बंद आहे. 

अकोला ः खासगी व्यापाऱ्यांना कापूस विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना भावांतर योजनेअंतर्गत हमीभाव किमतीच्या फरकाची रक्कम द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. ‘लॉकडाउन’मुळे राज्य सहकारी कापूस उत्पादक महासंघ (फेडरेशन) आणि भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) यांची कापूस खरेदी तब्बल महिनाभरापासून बंद आहे. 

जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणावर कापूस शिल्लक आहे. कापूस विक्रीसाठी जिल्ह्यातील जवळपास २७ हजार शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. नोंदणीची मुदत १० मे पर्यंत वाढवून देण्यात आली आहे. परंतु, अद्याप पणन महासंघाचे व सीसीआयचे बरेच कापूस खरेदी केंद्र सुरू झालेले नाहीत. 

सध्या तापमानात वाढ झाली आहे. उष्णतेमुळे घरात कापूस ठेवणे धोकादायक बनू शकते. त्यातच खरेदीअभावी अडचणी वाढल्या आहेत. शासकीय खरेदी केंद्रावरील गर्दी कमी करण्यासाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी दररोज २० शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केला जात आहे. यामुळे कापूस खरेदीची गती कमी आहे. 

शेतकऱ्यांकडील सर्व कापूस खरेदी करण्यासाठी मोठा कालावधी लागू शकतो. त्यामुळे सर्व जिनिंगमध्ये कापूस खरेदी सुरू करावी. त्याद्वारे जास्तीतजास्त शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करावा. यापूर्वी अनेक शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांकडे कापूस विक्री केली आहे. यापुढेही खासगी व्यापाऱ्यांना कापूस विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना भावांतर योजना लागू करून हमीभावातील फरकाची रक्कम त्यांना द्यावी, अशी मागणी संघटनेचे विलास ताथोड, अविनाश नाकट, धनंजय मिश्रा व डॉ. निलेश पाटील यांनी केली आहे.


इतर ताज्या घडामोडी
कृषी विधेयकांस विरोधासाठी इंडिया...नवी दिल्ली : बहुचर्चित कृषी विधेयकांवर राष्ट्रपती...
निकोप स्पर्धेसाठी मोदी सरकारचा प्रयत्नशेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि...
नगरमधील ३५ हजार शेतकरी विमा भरपाईपासून...नगर  ः जिल्ह्यात गेल्यावर्षी परतीच्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक घटली; दरात वाढपुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
रत्नागिरी जिल्ह्यात हळव्या भात कापणीत...रत्नागिरी  : हळवे भात पीक कापणी योग्य झाले...
औरंगाबादमध्ये थेट शेतीमाल विक्रीची ...औरंगाबाद  : औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात...
नांदेडमधील पीक नुकसानीची...नांदेड : नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून...
हिंगोली, परभणीतील पीक नुकसानीचे तत्काळ...हिंगोली  ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
पूरस्थितीचा गडचिरोली जिल्ह्यातील २०...गडचिरोली : जिल्ह्यात गोसेखुर्द धरणातून पाणी...
निर्यातीसाठी दर्जेदार हळद उत्पादन घ्याहिंगोली: हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात...
लातूर, नांदेडमध्ये दमदार पाऊसपुणे ः राज्यातील अनेक भागांत पावसाचे वातावरण...
मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त...मराठवाड्यातील बहुतांश क्षेत्र कोरडवाहू असून...
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...