थकीत बिलासाठी मुंबईत दुग्धविकास आयुक्त कार्यालयात ठिय्या आंदोलन

दूध उत्पादकांचे थकीत बिल तत्काळ अदा करा
दूध उत्पादकांचे थकीत बिल तत्काळ अदा करा

परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी येथील दुग्ध शाळेमध्ये दूधपुरवठा करणाऱ्या जिल्ह्यातील सहकारी संस्थांचे मार्च महिन्यापासून थकित वाहतूक कमिशन तसेच शेतकऱ्यांचे जुलै महिन्यापासून थकीत दूध देयक तत्काळ अदा करण्यात यावे, अशा मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच दूध उत्पादकांतर्फे  गुरुवारी (ता. १९) मुंबई येथील दुग्धविकास आयुक्त कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले.

परभणी दुग्ध शाळेअंतर्गत दूधपुरवठा करणाऱ्या जिल्ह्यातील सहकारी संस्थांचे यंदाच्या मार्च महिन्यापासून ते आजपर्यंत वाहतूक कमिशन थकित आहे. तसेच जिल्ह्यातील दूध उत्पादकांचे जुलै महिन्यापासून सुमारे १० ते १५ कोटी रुपये देयक थकित आहे. याबाबत सातत्याने आंदोलने केली. विविध पातळ्यावर पाठपुरावा केला, परंतु त्याकडे शासनाने दुर्लक्ष करण्यात आले. 

त्यामुळे शेतकरी उत्पादक तसेच सहकारी संस्था आर्थिक अडचणीमध्ये सापडले आहेत. त्यामुळे दुधाचे थकीत बिल, संस्थांचा वाहतूक कमिशनची रक्कम तत्काळ अदा करावी, अशी मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, अमरसिंह कदम, रामप्रसाद गमे, दीपक गरुड मुंबई येथील दुग्धविकास आयुक्तालयाच्या दालनात ठिय्या मांडला. थकित बिलाची रक्कम दिल्याशिवाय कार्यालय सोडणार नाही, असेही श्री. ढगे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com