दूध उत्पादकांच्या प्रश्‍नांकडे गांभीर्याने लक्ष द्या ः पशुसंवर्धन मंत्री केदार 

भंडारा ः दूध भुकटी प्रकल्प चालू करण्यात आला आहे. त्यानंतरही दूध उत्पादकांना हमीभाव मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. याकडे गांभीर्याने लक्ष देत दुग्ध उत्पादकांना कमी भाव मिळणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री सुनील केदार यांनी दिले.
Pay serious attention to milk producers' questions: Animal Husbandry Minister Kedar
Pay serious attention to milk producers' questions: Animal Husbandry Minister Kedar

भंडारा ः दूध भुकटी प्रकल्प चालू करण्यात आला आहे. त्यानंतरही दूध उत्पादकांना हमीभाव मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. याकडे गांभीर्याने लक्ष देत दुग्ध उत्पादकांना कमी भाव मिळणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री सुनील केदार यांनी दिले. 

जिल्हा परिषद सभागृहात मंत्री केदार यांच्या अध्यक्षतेखाली ‘कोरोना’ प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी खासदार सुनील मेंढे, आमदार नरेंद्र भोंडेकर, राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन, मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्‍वरी उपस्थित होते. जिल्ह्यात कोणतीही व्यक्‍ती उपाशी राहू नये, याबाबत काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. 

पौष्टिक आहार प्रत्येकाच्या घरोघरी पोचविण्याबाबत राज्य शासनाने निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे काम केले का? याचा अहवाल सादर करण्याची सूचना त्यांनी केली. लॉकडाऊनच्या काळात दुरुस्तीअभावी किंवा वीज विभागाच्या कारणास्तव एकाही गावातील नळ योजना बंद राहता कामा नये. तसेच कोणाचेही वीज कनेक्‍शन कापून नये. काही अडचण असल्यास मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे ते म्हणाले. 

गोबरवही पाणीपुरवठ्याबाबत ताबडतोब प्रस्ताव सादर करण्याची सूचना श्री. केदार यांनी दिली. आदिवासी समाजातील व्यक्‍तींना कृषिपंप देण्याची कार्यवाही करावी. पशुखाद्याचा तुटवडा होणार नाही याकडे लक्ष्य द्यावे. सिंचनाचे सर्व प्रकल्प ताबडतोब सुरू करावे व त्याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मंत्री केदार यांनी दिले. ‘कोरोना’ प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल त्यांनी प्रशासनाचे कौतुक केले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com