दुधी अळिंबी लागवडीसाठी जागेची निवड, वाढीसाठी लागणारे माध्यम आणि वातावरण तसेच काडाचे निर्ज
ताज्या घडामोडी
माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना आदरांजली
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना ३६ व्या पुण्यतिथीनिमित्त बुधवारी (ता.२५) येथील प्रीतिसंगमावरील समाधिस्थळी अभिवादन करण्यात आले.
कऱ्हाड, जि. सातारा ः आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना ३६ व्या पुण्यतिथीनिमित्त बुधवारी (ता.२५) येथील प्रीतिसंगमावरील समाधिस्थळी अभिवादन करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी अभिवादन केले.
माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त पालिकेने समाधी आकर्षक फुलांनी सजवली होती. सकाळपासूनच आदरांजली वाहण्यासाठी मान्यवरांची वर्दळ सुरू होती.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गृहरज्यमंत्री सतेज पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, माजी आमदार प्रभाकर घार्गे, पंचायत समिती सभापती प्रणव ताटे, ॲड. उदयसिंह पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, काँग्रसेचे डॉ. सुरेश जाधव, बाळासाहेब सोळसकर, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, माजी नगराध्यक्षा श्रीमती शारदा जाधव, मलकापूर नगराध्यक्षा नीलम येडगे, उपाध्यक्ष मनोहर शिंदे, प्रांताधिकारी उत्तम दीघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, मुख्याधिकारी रमाकांत डाके, माणिकराव पाटील, लालासाहेब पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी समाधिस्थळी अभिवादन केले.
- 1 of 1023
- ››