राज्यात कृषिपंपधारकांकडून १,१६० कोटींचा वीजबिल भरणा

कृषिपंप वीज धोरण योजनेअंतर्गत ११ लाख ९६ हजार १८४ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला असून, त्यांनी महावितरणकडे १,१६० कोटी ४७ लाख रुपयांचा भरणा केला आहे.
राज्यात कृषिपंपधारकांकडून १,१६० कोटींचा वीजबिल भरणा
राज्यात कृषिपंपधारकांकडून १,१६० कोटींचा वीजबिल भरणा

कोल्हापूर : कृषिपंप वीज धोरण योजनेअंतर्गत ११ लाख ९६ हजार १८४ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला असून, त्यांनी महावितरणकडे १,१६० कोटी ४७ लाख रुपयांचा भरणा केला आहे. या योजनेतील सहभागासोबतच आपल्या ग्रामपंचायत व जिल्हा क्षेत्रातील कृषी वीजयंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणासाठी तब्बल ७७३ कोटींचा हक्काचा ६६ टक्के निधीदेखील शेतकरी मिळविणार आहे.

दरम्यान, राज्यातील २ लाख ८७ हजार ६४ शेतकऱ्यांनी चालू वीजबिलांसह सुधारित मूळ थकबाकीपैकी ५० टक्के रकमेचा भरणा करून कृषिपंपाच्या वीजबिलांतून १०० टक्के थकबाकीमुक्ती मिळविली आहे. कोल्हापूर परिमंडलातील ५२, बारामती परिमंडलातील १३ आणि नागपूर परिमंडलातील एका गावाने घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीचे चालू व थकीत वीजबिलांची संपूर्ण रक्कम भरून अख्खे गावच थकबाकीमुक्त करण्याचा इतिहास घडविला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ६ गावांतील सर्व १३५ शेतकऱ्यांनी कृषिपंपाच्या थकबाकीचा भरणा करून संपूर्ण गावाला १०० टक्के थकबाकीमुक्त केले आहे. मागील वर्षी १ एप्रिल २०२० पासून जमा होणाऱ्या वसुलीच्या रकमेची कृषी आकस्मिक निधी म्हणून स्वतंत्र नोंद ठेवली जात आहे. कृषी आकस्मिक निधीमध्ये चालू व थकीत वीजबिलांच्या भरण्यातून आतापर्यंत एकूण ११६० कोटी ३४ लाख रुपये जमा झाले आहेत. त्यापैकी ६६ टक्के रक्कम म्हणजे तब्बल ७७३ कोटी रुपयांचा निधी संबंधित ग्रामपंचायत व जिल्ह्यातील कृषी वीजयंत्रणेच्या विविध कामांसाठी वापरणार असल्याचे महावितरणच्या सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com