नगर जिल्ह्यातील छावणीचालकांसाठी १३० कोटींचा प्रस्ताव

छावणीसाठी १५ एप्रिल ते ३१ मेदरम्यानच्या काळातील अनुदानमागणीचा १३० कोटींचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्या सूचनेनुसार लवकरच तो नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे सरकारकडे सादर केला जाणार आहे. - प्रशांत पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  : पशुधनासाठी सुविधा पुरविताना छावणी चालकांचा दैनंदिन खर्च मोठा आहे. अनुदानाची रक्कम वेळेवर मिळाल्यास चालकांचे अर्थचक्र कोलमडणार नाही. पशुधनाला योग्य सुविधा मिळतील, यासाठी चालकांच्या १५ एप्रिल ते ३१ मेअखेरपर्यंतच्या अनुदानासाठी १३० कोटी रुपयांच्या मागणीचा प्रस्ताव तयार झाला आहे. लवकरच तो सरकारकडे सादर केला जाणार आहे. 

जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट आहे. जनावरे जगविण्यासाठी जिल्ह्यात ५०३ चारा छावण्या सुरू आहेत. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी भाळवणी (ता. पारनेर) येथे १९ फेब्रुवारी रोजी पहिली चाराछावणी मंजूर केली. छावण्या सुरू होऊन शंभर दिवस पूर्ण झाले. जिल्हाधिकाऱ्यांनी आजअखेर जिल्ह्यात ५११ छावण्यांना मंजुरी दिली. त्यांपैकी ५०३ छावण्या सुरू आहेत. जामखेड, कर्जत, श्रीगोंदे, पारनेर, नगर, पाथर्डी, शेवगाव, संगमनेर, राहाता या तालुक्‍यांत छावण्यांना मंजुरी देण्यात आली आहे. 

छावणी चालविण्यासाठी होणारा खर्च मोठा आहे. छावणीच्या अनुदानासाठी प्रशासनाने सरकारकडे पाठपुरावा केला. त्यामुळे ५ मे रोजी ४६ कोटी ८१ लाख रुपयांचा पहिला निधी प्राप्त झाला. चालकांच्या खात्यांवर २७ फेब्रुवारी ते १५ एप्रिलदरम्यानची ५० टक्के रक्कम जमा करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. लहान जनावरांसाठी प्रतिदिन ३५, तर मोठ्या जनावरांसाठी ७० रुपये अनुदान निश्‍चित केले होते. वाढता खर्च लक्षात घेऊन एप्रिलमध्ये ४५-९० आणि मे महिन्यात ५०-१०० असे जनावरांसाठीचे अनुदान दर निश्‍चित करण्यात आले. बदलत्या दराचा हिशेब करून छावणीचालकांना अनुदान मिळणार आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com