सुधारित अध्‍यादेशात अडत्यांना पेमेंटची मुभा

शेतमाल
शेतमाल

पुणे ः बाजार समित्यांमधील शेतमालाच्या पांरपारिक खरेदी विक्री व्यवहारातील आडतदारांची नफेखोरी टाळण्यासाठी खरेदीदारांनी थेट शेतकऱ्यांना करावायाच्या पेमेंटची सुधारणा रद्द करीत, अडत्यांनीच शेतकऱ्यांना पेमेंट करावे, अशी दुरुस्ती पणन सुधारणांच्या अध्यादेशात करण्यात येणार आहे. या दुरुस्तीला मुख्यमंत्र्यांच्या राष्‍ट्रीय कृषी उच्चाधिकार समितीने मंजुरी दिल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. या दुरुस्तीमुळे आता पणन सुधारणांच्या विधेयकाला मंजुरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाली आहे. मात्र या सुधारणेसाठी नव्या सरकारची वाट पाहावी लागणार आहे. बाजार समित्यांमधील शेतीमालाच्या पारंपरिक खरेदी विक्री व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र शासनाने ॲग्रिकल्चर प्रोड्यूस ॲण्ड लाइव्ह स्टॉक कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग ॲण्ड सर्व्हिसेस (प्रमोशन ॲण्ड फॅसिलिटेशन) ॲक्ट २०१८ (मॉडेल ॲक्ट २०१८) सर्व राज्यांना पाठविला आहे.   या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकाने गेल्या वर्षी राज्यपालांच्या स्वाक्षरीने अध्यादेश प्रसिद्ध केला. मात्र या अध्यादेशातील तरतुदीनुसार बाजार समित्यांमध्ये आडत्यांनी खरेदीदारांची भूमिका न बजावता केवळ खरेदीदार आणि शेतकरी यांच्यात समन्वय साधावा, आणि शेतीमाल खरेदीदाराने शेतकऱ्याला थेट बॅंक खात्यात पेमेंट करावे असे सुचविण्यात आले होते. मात्र या तरतुदीला राज्यातील बाजार समित्यांमधील आडते, व्यापारी संघटनांनी विरोध दर्शवीत बाजार समित्या बंदचा इशारा दिला होता. यानंतर राज्य सरकारने या अध्यादेशाला स्थगिती देत, सुधारणा करण्याचे आश्‍वासन दिले होते. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली निती आयोगाने १ जुलै रोजी कृषी क्षेत्राच्या विकासासाठी राष्ट्रीय उच्चाधिकार समितीची स्थापना केली. या समितीच्या दोन बैठकांमध्ये ई नाम आणि पणन सुधारणांबाबत चर्चा झाली.  मुंबईत झालेल्या बैठकीमध्ये पणन विभागातील उच्चाधिकाऱ्यांनी बाजार समित्यांमधील शेतमाल खरेदी विक्री व्यवहारातील अडत्यांचे महत्त्व पटवून दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी खरेदीदारांनी थेट शेतकऱ्यांना करावायाच्या पेमेंटची सुधारणा रद्द करीत, अडत्यांनीच शेतकऱ्यांना पेमेंट करावे या दुरुस्तीला मान्यता दिल्याचे समजते. या मान्यतेमुळे आता पणन सुधारणांनी गती मिळण्याची शक्यता आहे. मात्र या सुधारणा आता नवीन सरकार आल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com