agriculture news in Marathi, PDKV agreement for colorful textile, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

रंगीत कापड उत्पादनासाठी ‘पंदेकृवि’चा सामंजस्य करार
टीम अॅग्रोवन
बुधवार, 31 जुलै 2019

अकोला  ः केंद्रीय कापूस संशोधन संस्था (सीआयसीआर) नागपूर, केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था (सीरकॉट) मुंबई आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांच्यात नैसर्गिकरित्या रंगीत कापडनिर्मिती व विक्रीसाठी सामंजस्य करार मुंबई येथे झाला. 

अकोला  ः केंद्रीय कापूस संशोधन संस्था (सीआयसीआर) नागपूर, केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था (सीरकॉट) मुंबई आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांच्यात नैसर्गिकरित्या रंगीत कापडनिर्मिती व विक्रीसाठी सामंजस्य करार मुंबई येथे झाला. 

या वेळी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेचे संचालक डॉ. पी. जी. पाटील, विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. व्ही. के. खर्चे, सीरकॉटचे सर्व विभाग प्रमुख, शास्त्रज्ञ प्रामुख्याने उपस्थित होते. या उपक्रमाअंतर्गत विद्यापीठाच्या ५० एकर प्रक्षेत्रावर ‘वैदेही’ या तपकिरी रंगाच्या कापूस वाणाची २०१९ मध्ये पेरणी करण्यात आली असून उत्पादित होणारा कापूस सीरकॉटला पुरविण्यात येणार आहे. यावर प्रक्रिया करून नैसर्गिकरित्या रंगीत कापड बाजारात उपलब्ध होणार आहे.

यामध्ये रंगीत कापूस बियाणे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी केंद्रीय कापूस संशोधन संस्थेची आहे. पूर्णपणे सुरक्षित ठिकाणी मोठ्या प्रमाणात रंगीत कापूस उत्पादित करण्याची जबाबदारी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि कापसापासून कापड (शर्ट, जॅकेट) निर्माण करून त्याची विक्री करण्याची जबाबदारी केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेने यांनी उचलली आहे.

संशोधनात्मक कार्य करणाऱ्या संस्थांनी एकत्र येऊन विकासात्मक कार्य करावे, या तत्त्वाने नैसर्गिकरीत्या रंगीत कापडनिर्मिती व विक्रीसाठी तिहेरी स्वरूपाचा सामंजस्य करार मुंबई येथील केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेत संपन्न झाला.

इतर कृषी शिक्षण
उपकरण देईल आजारी जनावराची पूर्व सूचनाएसएनडीटी विद्यापीठाच्या मुंबईमधील प्रेमलीला...
टिकवून ठेवा जमिनीची सुपीकताजमीन हा निसर्गाकडून मिळालेला अनमोल ठेवा आहे....
तंत्रज्ञानाच्या बळावर ‘कृषी’च्या...नागपूर : कृषी अभ्यासक्रमाला प्रवेशित...
असे मिळते मातीरहित माध्यम नैसर्गिक...विविध व्यावसायिक पिकांच्या लागवडीसाठी मातीविरहित...
कल्पनेतून केली अडचणींवर मातजगभरात शेतकरी आपली दैनंदिन कार्य करीत असताना अनेक...
मातीच्या प्रकारानुसार जलसंधारणाचे उपाय...जुलै ते सप्टेंबर या महिन्यांत पडणाऱ्या पावसाची...
शेतकरी वाणाची नोंदणी करताना...शेतकऱ्यांना स्वतः विकसित केलेल्या वाणांचे सर्व...
स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना...विद्यार्थी मित्रांनो/मैत्रिणींनो नमस्कार, नागरी...
संशोधन, शिक्षणामध्ये बदलाची गरजगेल्या काही वर्षांचा आढावा घेता कृषी क्षेत्राकडे...
पॅकिंग शोषणार फळातील ओलावावाहतूक आणि साठवणुकीमध्ये आर्द्रतेचा परिणाम होऊन...
खास हॅलोवीनसाठी मानवी चेहऱ्याचे भोपळे !अमेरिकेत हॅलोवीन या सणामध्ये भोपळ्याला असलेले...
पशुखाद्यातील प्रतिजैविकांच्या वापरामुळे...उत्तर अमेरिका आणि युरोपमध्ये १९५० पासून...
‘आनंद निकेतन`ने घेतला शिक्षण,...स्वावलंबनातून शिक्षण तसेच सहिष्णुता, समता,...
पर्यावरण, वन्यजिवांची काळजी घ्या... मानवी हस्तक्षेपामुळे आज सुमारे ४१ हजार प्रजाती...
‘वनामकृवि‘चे बीटी वाण येत्या हंगामातनागपूर : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...