agriculture news in Marathi, PDKV agreement for drone use, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापराबाबत `पंदेकृवि’चा करार

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 23 जुलै 2019

अकोला ः कृषी क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर प्रायोगिक तत्त्वावर करण्यात येत आहे. या तंत्राद्वारे पिकांचे सखोल निरीक्षण केल्यास पीकवाढीच्या अनेक समस्या अत्यंत अल्पावधीत निकाली काढल्या जाऊ शकतात, ही उपलब्धी लक्षात घेता ड्रोन तंत्राद्वारे पिकांचे दृष्टीपरीक्षण (स्कॅनिंग) करणे व त्यावर आधारित माहितीच्या आधारे अचूक शेती सल्ला देता यावा, या दृष्टिकोनातून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अॅमेझिंग एरीअल सोलुशन्स प्रा. लि. पुणे यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. 

अकोला ः कृषी क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर प्रायोगिक तत्त्वावर करण्यात येत आहे. या तंत्राद्वारे पिकांचे सखोल निरीक्षण केल्यास पीकवाढीच्या अनेक समस्या अत्यंत अल्पावधीत निकाली काढल्या जाऊ शकतात, ही उपलब्धी लक्षात घेता ड्रोन तंत्राद्वारे पिकांचे दृष्टीपरीक्षण (स्कॅनिंग) करणे व त्यावर आधारित माहितीच्या आधारे अचूक शेती सल्ला देता यावा, या दृष्टिकोनातून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अॅमेझिंग एरीअल सोलुशन्स प्रा. लि. पुणे यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. 

याप्रसंगी कुलगुरू डॉ. विलास भाले अध्यक्षस्थानी होते. उपस्थितांमध्ये संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, कृषी विद्या विभागाचे प्रमुख डॉ. एन. डी. पार्लावार, प्राध्यापक डॉ. ए. एन. पसलावार, डॉ. अनिल करुणाकर, डॉ. जे. पी. देशमुख, डॉ. एम. आर. देशमुख, यांच्यासह अॅमेझिंग एरिअल सोलुशन्स प्रा. लि. पुणेचे संचालक आनंद देशपांडे उपस्थित होते.

ड्रोन तंत्राद्वारे पीक निरीक्षण व दृष्टी परीक्षण करणे सुकर होणार असून या तंत्राच्या माध्यमातून निघणाऱ्या निष्कर्षाकडे कृषी क्षेत्रातील शास्त्रज्ञांसह शेतकरी वर्गाचे लक्ष राहील आणि अतिशय अचूक पद्धतीने जमीन, पीक, कीड, रोग आदींबाबतची माहिती उपलब्ध होऊन फायद्याची शेती दृष्टीपथास येईल, असा आत्मविश्वास कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी व्यक्त केला.
 
अशा प्रकारचा हा राज्यातील पहिलाच सामंजस्य करार असल्याने काळजीपूर्वक निरीक्षणे नोंदविण्याचे आवाहनसुद्धा डॉ. भाले यांनी या करारप्रसंगी केले. कुलगुरू कार्यालयाच्या सभागृहात संपन्न झालेल्या या महत्त्वाकांक्षी सामंजस्य करारवर विद्यापीठाच्यावतीने संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, तर अॅमेझिंग एरिअल सोलुशन्स प्रा. ली. पुणे यांचे वतीने संचालक श्री. मिलिंद मोडक यांनी कुलगुरू डॉ.  भाले यांचे उपस्थितीत स्वाक्षरी केली.  

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी केले, तर कृषी विद्याविभागाचे प्रा. डॉ. जयंत देशमुख यांनी आभार मानले. 


इतर अॅग्रो विशेष
जनावरांचे उत्पादन कसे वाढेल?दुग्ध व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी जनावरांची...
मध्यप्रदेश सरकारची शेतकऱ्यांना प्रति...वृत्तसेवा - मध्य प्रदेश सरकारने मुख्यमंत्री...
गहू तांदूळ, कारळासह ओट्सच्या नव्या जाती...वृत्तसेवा - मध्य प्रदेशातील जबलपूर येथील राज्य...
इतर क्षेत्रांच्या तुलनेत कृषी...यंदाच्या आर्थिक वर्षात कृषी क्षेत्राने इतर...
गायीचे मायांग तिरके का होते?गाय किंवा म्हैस माजावर आल्यानंतर सोट टाकण्याचे...
महाविकास आघाडी सरकाचा निर्णय...महाविकास आघाडी सरकारने भुमी अधिग्रहण कायद्याला (...
युवा शेतकऱ्याचे अभ्यासपूर्ण प्रिसिजन...शेतीतील विज्ञानाचा अभ्यास, विविध देशांतील...
जातिवंत पैदाशीसह आदर्श गोठा व्यवस्थापनमाणकापूर (जि. बेळगाव, कर्नाटक) येथील प्रफुल्ल व...
खतांचे वाढीव दर कमी करा मुंबई : अनुदान मिळणाऱ्या खत पुरवठादारांनी...
तापमानात वाढ, गारठा होतोय कमी पुणे : राज्यात अशंतः ढगाळ हवामान असले तरी,...
पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या ...मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदा आणि सरकारच्या...
‘सहकार’ला पुन्हा हवे  लेखापरीक्षणाचे...पुणे ः राज्याच्या सहकार चळवळीतील गैरप्रकार...
बदलत्या वातावरणाचे बेदाणा निर्मितीवर...सांगली ः जिल्ह्यात बेदाणा निर्मितीला गती आली आहे...
तुरीच्या दरात काहीशी सुधारणा पुणे ः आठवडाभरात तुरीची आवक काहीशी मंदावली होती....
ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत  डॉ. एन. डी...  कोल्हापूर ः ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत,...
विद्यापीठांमधील कर्मचाऱ्यांचे ...पुणेः कृषी विद्यापीठांमध्ये रोजंदारीवर लागलेल्या...
पपईला मिळेना किलोला ४.७५ रुपयांचाही...जळगाव ः  खानदेशात पपई दर शेतकऱ्यांना...
तूर डाळ शंभरी गाठणार नागपूर ः खरीप पिकांना अवेळी आलेल्या पावसाचा फटका...
बीटी वांगी लागवडीसाठी १७...पुणे ः जनुकीय परावर्तित (जीएम) बियाणे बंदी...
हवामानशास्त्र विभागाचा अंदाज, पारा...  पुणे - दक्षिण कोकणावर गेल्या तीन...