agriculture news in marathi PDKV changes promotion decision after High court rule | Agrowon

पदोन्नती प्रकरणात ‘पंदेकृवि’ने काढले पदनवती आदेश

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 7 एप्रिल 2020

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाअंतर्गत २०१८-१९ या वर्षात सहायक प्राध्यापक पदावरून सहयोगी प्राध्यापक पदावर दिलेल्या पदोन्नती रद्द करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला होता. या निर्णयाला अनुसरून विद्यापीठाने पदनवतीचे आदेश काढले आहेत. 

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाअंतर्गत २०१८-१९ या वर्षात सहायक प्राध्यापक पदावरून सहयोगी प्राध्यापक पदावर दिलेल्या पदोन्नती रद्द करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला होता. या निर्णयाला अनुसरून विद्यापीठाने पदनवतीचे आदेश काढले आहेत. 

न्यायालयाने २७ फेब्रुवारी २०२० ला आदेश देत चार आठवड्यांत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. या कालावधीला वाढ मिळावी याबाबत दाखल केलेला अर्ज २६ मार्चला न्यायालयाने फेटाळला होता. २७ फेब्रुवारीला न्यायमुर्ती अतुल चांदूरकर आणि न्यायमुर्ती विनय जोशी यांच्या खंडपीठाने डॉ. आम्रपाली अतुल आखरे, डॉ. मनीष देशमुख, डॉ. शिवाजी नागपुरे, डॉ. संजय काकडे व डॉ. वनिता खोबरकर या पाच प्राध्यापकांनी दाखल केलेल्या तीन स्वतंत्र याचिकांच्या प्रदीर्घ सुनावणीनंतर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापकाच्या पदोन्नत्या रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला होता.

या पदोन्नती प्रकरणात पदोन्नतीचे निकष बदलले गेल्यामुळे याचिकाकर्त्यांचा घटनात्मक हक्क हिरावला गेला. सदर पदोन्नत्या निकषांना डावलून देण्यात आल्या असे उच्च न्यायालयाने निर्णयात नमूद केले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ प्रशासनाने १३ सहयोगी प्राध्यापकांना सहाय्यक प्राध्यापक पदावर पदानवत करण्याबाबतचे आदेश पारित केले. हे आदेश २७ मार्चला काढले आहेत. विद्यापीठ प्रशासनाने सर्व पदानवत सहायक प्राध्यापकांची सद्यःस्थितीत असलेल्या आस्थापनेवरच पोस्टिंग करण्याचे आदेश दिले आहेत.


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...