‘पंदेकृवि’च्या दीक्षान्त सोहळ्यात मुलींनी मारली बाजी !

‘पंदेकृवि’च्या दीक्षान्त सोहळ्यात मुलींनी मारली बाजी !
‘पंदेकृवि’च्या दीक्षान्त सोहळ्यात मुलींनी मारली बाजी !

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाच्या ३३ व्या दीक्षांत सोहळ्यात पदवी घेणाऱ्यांत तसेच पदकांची कमाई करणाऱ्यात मुलींनी बाजी मारली. बीएस्सी (कृषी) ची स्नेहल विजय चव्हाण हिने तीन सुवर्ण, तीन रौप्य अाणि तीन रोख पारितोषिके कमावत अव्वल राहण्याचा मान मिळवला. कृषी व फलोत्पादनमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते तिचा दीक्षांत सोहळ्यात गौरव होत असताना संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.  पातूर तालुक्यातील मूळ रहिवाशी असलेल्या स्नेहलचे वडील कृषी खात्यात अधिकारी अाहेत. तिने येथील कृषी महाविद्यालयात बीएसस्सीचे शिक्षण घेतले. हे शिक्षण घेताना तिच्या सर्वांगीण कामगिरीची दखल घेत तिला तब्बल नऊ पदके देऊन सन्मानित करण्यात अाले. तीन सुवर्ण, तीन रौप्य तसेच तीन रोख पुरस्कार देण्यात अाले. अागामी काळात उच्च शिक्षण घेऊन पीएचडी करायची असल्याचे तिने सांगितले. सोबतच अातापासूनच यूपीएसस्सीची तयारी सुरू केली असल्याचे ती ‘ॲग्रोवन’शी बोलताना म्हणाली.  या सोहळ्यात मुलांमध्ये एमस्सीचा पदवीधर लालसींग राठोड याने पाच सुवर्ण व एक रौप्य पदक मिळवून मुलांमध्ये बाजी मारली. याशिवाय कु. सिद्दागणगम्मा. के. अार, कु. ज्योती देवी, अर्चना बापू जाधव, रेश्मा दत्तात्रेय रगडे, कु. साराण्या टी, सुचिता भोसले, अश्विनी कुंघडकर, रेश्मा शिंदे, कु. ए. ए. भोंडवे, स्वाती पाटील, राहुल बेलदार, अार्या क्रिष्णा, राजकुमार पवार, निशिगंधा पाटील, पूजा चंद्रवंशी, दुप्पाला मनोजकुमार, कु. प्रियंका ए. व्ही,  राहुल माने  यांनी पदके मिळवली. बीएस्सी गटात स्नेहल चव्हाणसह अंजली बिजवे, प्रज्ञा राउत, प्रज्ञा बांबोदकर, प्रणाली खिरतकर, दुर्गा बघेले, अश्विनी झाडोकार, शुभम डोईफोडे, दीपक कुमार,  अनुराधा चोपडे, कु. उन्नीमाया, राहुल भड, सेजल सेदाणी यांनी पदके मिळवली. संशोधनासाठी डॉ. पी. एच. बकाने, डॉ. एम. बी. नागदेवे, कु. एम. बी. खेडकर, डॉ. एस. अार. काळबांडे, व्ही.पी. खांबलकर, डॉ. यू. एस. कुळकर्णी, डॉ. शामसुल हयात मो. शक यांच्यासह अधिकारी वर्गातून जे. अार. गावंडे, जी. एस. होगे यांना सन्मानित करण्यात अाले. पदवी मिळाल्यानंतर विद्यार्थी, विद्यार्थिनी विद्यापीठ परिसरात जोरदार जल्लोश केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com