खानदेशात पीककर्ज वितरण अपूर्णच

खानदेशात पीककर्ज वितरण अपूर्णच
खानदेशात पीककर्ज वितरण अपूर्णच

जळगाव  ः खानदेशात खरिपासंबंधी पीक कर्जवाटप ४३ टक्केही पूर्ण झालेले नसल्याची स्थिती आहे. जळगाव जिल्ह्यात पीक कर्जवाटपाचा लक्ष्यांक सुमारे तीन हजार कोटी असून, यातून १५०० कोटी कर्जही वितरित झालेले नाही. तर धुळे-नंदुरबारातही एकूण लक्ष्यांकापैकी १००० कोटी पीककर्ज वितरित झालेले नाही. खरीप हंगाम संपण्यास सुमारे २७ दिवस राहिले आहेत, तरीही पीक कर्ज १०० टक्के वितरित न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.   बागायती पीककर्ज देण्यासही राष्ट्रीयीकृत बॅंका हात आखडता घेत असून, यामुळे पीक कर्जवाटपाची गती संथ आहे. जळगाव, यावल, जामनेर, पाचोरा, चाळीसगाव भागात कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या अनेक शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बॅंकांनी कर्जखाते निल झाल्याचे दाखले दिलेले नाहीत. तसेच नव्याने कर्जही त्यांना मिळालेले नाही. असे सुमारे १० हजार शेतकरी असल्याचे सांगितले जात आहे.  राष्ट्रीयीकृत बॅंकांना नंदुरबार जिल्ह्यात सुमारे १४०० कोटी तर धुळ्यात सुमारे १३०० कोटी रुपये पीक कर्ज वितरण करायचे आहे. यातील धुळे-नंदुरबार जिल्हा बॅंकेला दोन्ही जिल्ह्यांमध्ये मिळून सुमारे ९०० कोटी पीककर्ज वितरण करायचे असून, या बॅंकेने पीक कर्जवाटपासंबंधी बऱ्यापैकी कार्यवाही केली आहे. तर धुळ्यात राष्ट्रीयीकृत बॅंकांनी सुमारे ४५० कोटी आणि नंदुरबारात सुमारे ४०० कोटी रुपये पीककर्ज वितरण झाल्याचे सूत्रांनी सांगितले.  नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्‍यात कर्जमाफी योजनेसाठी पात्र असताना व ऑनलाइन अर्ज भरूनही जवळपास ४ हजार ७०० शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. या सर्व शेतकऱ्यांना मागील दोन वर्षांपासून नवीन पीककर्जाची उचल करण्यासाठी अडचणी येत आहेत. बॅंका त्यांना कर्ज देत नाही, कारण ते थकबाकीदार म्हणून गणले जातात. त्यांना कर्ज भरेल्याचा किंवा कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाल्याचा दाखला बॅंक देत नाही. त्यांच्या सातबारा उताऱ्यावर पीककर्जाच्या नोंदी आहेत, त्या दूर होत नाहीत, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com