नांदेडमध्ये पीककर्ज वाटप संथ; राष्ट्रीयीकृत बँकांकडून ठेंगा

नांदेड जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ११६८ कोटी रुपयांच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट प्रशासनाने बॅंकांना दिले आहे, असे असताना जिल्ह्यात सर्वाधीक शाखा असलेल्या राष्ट्रीयीकृत बॅंकांनी आजपर्यंत केवळ १० टक्केच पीककर्ज वाटप केल्याचे स्पष्ट झाले आहे.
नांदेडमध्ये पीककर्ज वाटप संथ;  राष्ट्रीयीकृत बँकांकडून ठेंगा Peak loan allocation slow in Nanded; Thenga from nationalized banks
नांदेडमध्ये पीककर्ज वाटप संथ;  राष्ट्रीयीकृत बँकांकडून ठेंगा Peak loan allocation slow in Nanded; Thenga from nationalized banks

नांदेड : जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ११६८ कोटी रुपयांच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट प्रशासनाने बॅंकांना दिले आहे, असे असताना जिल्ह्यात सर्वाधीक शाखा असलेल्या राष्ट्रीयीकृत बॅंकांनी आजपर्यंत केवळ १० टक्केच पीककर्ज वाटप केल्याचे स्पष्ट झाले आहे. केवळ जिल्हा बॅंकेने ६२ टक्के व ग्रामीण बॅंकने १५ पीककर्ज वाटप केल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयाकडून मिळाली. जिल्हास्तरीय बॅंकर्स कमिटीच्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी आगामी खरीप हंगामात नांदेड जिल्ह्यासाठी ११६८ कोटी तर रब्बीसाठी २९२ कोटी, असे एकूण १ हजार १६८ कोटींचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट २८ बॅंकांच्या वेगवेगळ्या शाखांना दिले आहे. या बाबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी  शेतकऱ्यांना वेळेत कर्ज देण्याची सूचना दिली होती. पीककर्ज माफीसाठी पात्र ठरलेल्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम वर्ग झाल्यानंतर त्या खात्याला नव्याने कर्ज मिळेल, अशा विचारात असलेल्या शेतकऱ्यांना मात्र बॅंकांनी अद्याप कर्ज वाटप केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकांनी आजपर्यंत जिल्ह्यात ८ हजार २२८ खातेदारांना ७७ कोटी ७३ लाखांचे कर्ज वाटप केले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडून २१ हजार ८२१ शेतकऱ्यांना १२८ कोटी ३९ लाख तर महाराष्ट्र ग्रामिण बॅंकेने ४ हजार ५२६ शेतकऱ्यांना ३३ कोटी ७५ लाखांचे कर्ज वाटप केले आहे. जिल्ह्यात २० टक्क्यानुसार आजपर्यंत खरिपासाठी एकूण ३४ हजार ५७५ शेतकऱ्यांना २३९ कोटी ८७ लाख रुपयांचे कर्ज वाटप केल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयाकडून मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com