Agriculture news in marathi Peak loan allocation slow in Nanded; Thenga from nationalized banks | Page 2 ||| Agrowon

नांदेडमध्ये पीककर्ज वाटप संथ; राष्ट्रीयीकृत बँकांकडून ठेंगा

टीम अॅग्रोवन
रविवार, 20 जून 2021

नांदेड जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ११६८ कोटी रुपयांच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट प्रशासनाने बॅंकांना दिले आहे, असे असताना जिल्ह्यात सर्वाधीक शाखा असलेल्या राष्ट्रीयीकृत बॅंकांनी आजपर्यंत केवळ १० टक्केच पीककर्ज वाटप केल्याचे स्पष्ट झाले आहे.

नांदेड : जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ११६८ कोटी रुपयांच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट प्रशासनाने बॅंकांना दिले आहे, असे असताना जिल्ह्यात सर्वाधीक शाखा असलेल्या राष्ट्रीयीकृत बॅंकांनी आजपर्यंत केवळ १० टक्केच पीककर्ज वाटप केल्याचे स्पष्ट झाले आहे. केवळ जिल्हा बॅंकेने ६२ टक्के व ग्रामीण बॅंकने १५ पीककर्ज वाटप केल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयाकडून मिळाली.

जिल्हास्तरीय बॅंकर्स कमिटीच्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी आगामी खरीप हंगामात नांदेड जिल्ह्यासाठी ११६८ कोटी तर रब्बीसाठी २९२ कोटी, असे एकूण १ हजार १६८ कोटींचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट २८ बॅंकांच्या वेगवेगळ्या शाखांना दिले आहे. या बाबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी  शेतकऱ्यांना वेळेत कर्ज देण्याची सूचना दिली होती.

पीककर्ज माफीसाठी पात्र ठरलेल्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम वर्ग झाल्यानंतर त्या खात्याला नव्याने कर्ज मिळेल, अशा विचारात असलेल्या शेतकऱ्यांना मात्र बॅंकांनी अद्याप कर्ज वाटप केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकांनी आजपर्यंत जिल्ह्यात ८ हजार २२८ खातेदारांना ७७ कोटी ७३ लाखांचे कर्ज वाटप केले आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडून २१ हजार ८२१ शेतकऱ्यांना १२८ कोटी ३९ लाख तर महाराष्ट्र ग्रामिण बॅंकेने ४ हजार ५२६ शेतकऱ्यांना ३३ कोटी ७५ लाखांचे कर्ज वाटप केले आहे. जिल्ह्यात २० टक्क्यानुसार आजपर्यंत खरिपासाठी एकूण ३४ हजार ५७५ शेतकऱ्यांना २३९ कोटी ८७ लाख रुपयांचे कर्ज वाटप केल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयाकडून मिळाली.


इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात ५५ हजार हेक्टरला तडाखाअकोला ः गेल्या आठवड्यात जिल्ह्यात ५२ पैकी ३५...
रत्नागिरीत हजार हेक्टर भातक्षेत्र...रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे मोठ्या नद्यांना आलेल्या...
सांगलीत ३३ हजार हेक्टर पिकांचे नुकसानसांगली : जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून...
खानदेशात पंधरा हजार हेक्टर बाजरीची...जळगाव : खानदेशात यंदा पाऊस लांबल्याने आणि...
नाशिक बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे...नाशिक : नाशिक बाजार समितीसंदर्भात शासनाकडे...
खानदेशात हलक्या सरी; जोरदार पावसाचा अभावजळगाव : खानदेशात यंदा पाऊसमान अद्याप कमी आहे....
नांदेड जिल्ह्यात पीकविमा योजनेत नऊ लाख...नांदेड : पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी...
मराठवाड्यातील पशुविज्ञान केंद्राचे घोडे...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदेने महाराष्ट्र...
परभणी जिल्ह्यात भाजीपाला पिकांची नासाडीपरभणी ः अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेकडो एकरवरील...
पैसे थकवणाऱ्या व्यापाऱ्यांचे लिलाव बंद...सोलापूर ः शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या पट्ट्या...
पुण्यात लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या पुणे : जिल्ह्यात जुलै महिन्याच्या तिसऱ्या...
पीकविम्यासाठी स्वाभिमानीचा कृषी...पुणे : पीकविमा योजनेतील गेल्या खरिपाची नुकसान...
नगरमध्ये खरीप पेरण्यांनी सरासरी ओलांडली नगर : नगर जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांनी सरासरी...
`लातूरला शेतकऱ्यांनी भरला २३ कोटीचा...लातूर : ‘‘पंतप्रधान खरीप पीक विमा २०२१...
नियमित कर्जदार शेतकऱ्यांना  मिळणार...गोंदिया : राज्य सरकारने नियमित कर्ज परतफेड...
सातारा : पाच हजार हेक्टर क्षेत्र ...सातारा : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
सांगलीतील पूर ओसरू लागला  सांगली : कृष्णा नदीला आलेल्या महापुराचा सांगली...
सिंधुदुर्गमध्ये नुकसानीचे पंचनामे सुरू सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या...
पुराचा वारंवार फटका बसणाऱ्या घरांच्या...सांगली : ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना...
रानभाज्यांचे आहारातील महत्त्वमहाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरणानुसार, तिथे...