पीककर्ज व्याज सवलत योजनेस ३० जूनपर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी पेरणीच्या आधी पीककर्ज योजनेचा लाभ घेऊन आपल्या हंगामाचे आर्थिक नियोजन करावे. बँकांनी पीककर्ज योजनेची प्रक्रिया १५ जुलैपर्यंत सुरू ठेवावी, असे निर्देश देत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली.
पीककर्ज व्याज सवलत योजनेस ३० जूनपर्यंत मुदतवाढ Peak loan interest rebate Extension of the scheme till June 30
पीककर्ज व्याज सवलत योजनेस ३० जूनपर्यंत मुदतवाढ Peak loan interest rebate Extension of the scheme till June 30

अकोला : शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी पेरणीच्या आधी पीककर्ज योजनेचा लाभ घेऊन आपल्या हंगामाचे आर्थिक नियोजन करावे. बँकांनी पीककर्ज योजनेची प्रक्रिया १५ जुलैपर्यंत सुरू ठेवावी, असे निर्देश देत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली. व्याज सवलत योजनेस ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचेही ते म्हणाले.   जिल्हाधिकारी कार्यालयात पीककर्ज योजनेच्या अनुषंगाने खरीप पीक आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस जिल्हाधिकारी पापळकर संबोधित करीत होते. या वेळी स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे क्षेत्रिय प्रबंधक श्रीआंशू, बॅंक ऑफ महाराष्ट्रचे झोनल मॅनेजर अभिजित चन्दा, विदर्भ ग्रामीण बॅंकेचे क्षेत्रीय प्रबंधक सुबोध बन्नोरे, सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाचे सहायक क्षेत्रीय प्रबंधक ज्ञानेश्वर टापरे, युनियन बॅंकेचे मुख्य प्रबंधक अतुल मोहोड, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे महाव्यवस्थापक सुधाकर झळके आदी उपस्थित होते. गत वर्षीच्या खरीप हंगामाच्या वेळी पीककर्ज योजनेचा लाभ १ लाख ६४३४ शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला होता. यंदा अद्याप पर्यंत ६४ हजार ५४६ जणांना ५९३ कोटी ३३ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप झाले आहे. तथापि, यंदाचा लक्षांक हा १ लाख ४२ हजार ५०० इतका असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवा, असेही ते म्हणाले. ज्या शेतकऱ्यांनी सन २०२०-२१या वर्षाकरिता अल्प मुदतीचे पीककर्ज घेतले आहे, अशा शेतकऱ्यांना कर्ज परतफेडीची मुदत बुधवारपर्यंत (ता.३०) केंद्र शासनाने वाढविलेली असून, तीन लाख रुपयांपर्यंतच्या पीककर्जावर केंद्र शासनाची व्याज सवलत योजना लागू राहील, असे जिल्हा उपनिबंधकांनी कळविले आहे. अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत  सन २०२०-२१मध्ये वाटप केलेल्या खरीप पीककर्ज परतफेडीस बँकांनी ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे जिल्हा बँक, तसेच सेवा सहकारी संस्थांमार्फत पीककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनाही या मुदतीत कर्जाची परतफेड केल्यास शून्य टक्के व्याज सवलतीचा लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील पीककर्जाची परतफेड ३० जूनपर्यंत करून नवीन पीककर्जासाठी पात्र व्हावे, असे आवाहन पापळकर, जिल्हा उपनिबंधक विजय कहाळेकर, जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक आलोक तेरानिया यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com