Agriculture news in marathi Peak loan interest rebate Extension of the scheme till June 30 | Page 2 ||| Agrowon

पीककर्ज व्याज सवलत योजनेस ३० जूनपर्यंत मुदतवाढ

टीम अॅग्रोवन
शनिवार, 19 जून 2021

शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी पेरणीच्या आधी पीककर्ज योजनेचा लाभ घेऊन आपल्या हंगामाचे आर्थिक नियोजन करावे. बँकांनी पीककर्ज योजनेची प्रक्रिया १५ जुलैपर्यंत सुरू ठेवावी, असे निर्देश देत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली.

अकोला : शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी पेरणीच्या आधी पीककर्ज योजनेचा लाभ घेऊन आपल्या हंगामाचे आर्थिक नियोजन करावे. बँकांनी पीककर्ज योजनेची प्रक्रिया १५ जुलैपर्यंत सुरू ठेवावी, असे निर्देश देत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली. व्याज सवलत योजनेस ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचेही ते म्हणाले. 

जिल्हाधिकारी कार्यालयात पीककर्ज योजनेच्या अनुषंगाने खरीप पीक आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस जिल्हाधिकारी पापळकर संबोधित करीत होते. या वेळी स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे क्षेत्रिय प्रबंधक श्रीआंशू, बॅंक ऑफ महाराष्ट्रचे झोनल मॅनेजर अभिजित चन्दा, विदर्भ ग्रामीण बॅंकेचे क्षेत्रीय प्रबंधक सुबोध बन्नोरे, सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाचे सहायक क्षेत्रीय प्रबंधक ज्ञानेश्वर टापरे, युनियन बॅंकेचे मुख्य प्रबंधक अतुल मोहोड, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे महाव्यवस्थापक सुधाकर झळके आदी उपस्थित होते.

गत वर्षीच्या खरीप हंगामाच्या वेळी पीककर्ज योजनेचा लाभ १ लाख ६४३४ शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला होता. यंदा अद्याप पर्यंत ६४ हजार ५४६ जणांना ५९३ कोटी ३३ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप झाले आहे. तथापि, यंदाचा लक्षांक हा १ लाख ४२ हजार ५०० इतका असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवा, असेही ते म्हणाले.

ज्या शेतकऱ्यांनी सन २०२०-२१या वर्षाकरिता अल्प मुदतीचे पीककर्ज घेतले आहे, अशा शेतकऱ्यांना कर्ज परतफेडीची मुदत बुधवारपर्यंत (ता.३०) केंद्र शासनाने वाढविलेली असून, तीन लाख रुपयांपर्यंतच्या पीककर्जावर केंद्र शासनाची व्याज सवलत योजना लागू राहील, असे जिल्हा उपनिबंधकांनी कळविले आहे.

अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत  सन २०२०-२१मध्ये वाटप केलेल्या खरीप पीककर्ज परतफेडीस बँकांनी ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे जिल्हा बँक, तसेच सेवा सहकारी संस्थांमार्फत पीककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनाही या मुदतीत कर्जाची परतफेड केल्यास शून्य टक्के व्याज सवलतीचा लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील पीककर्जाची परतफेड ३० जूनपर्यंत करून नवीन पीककर्जासाठी पात्र व्हावे, असे आवाहन पापळकर, जिल्हा उपनिबंधक विजय कहाळेकर, जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक आलोक तेरानिया यांनी केले आहे.


इतर अॅग्रो विशेष
राज्यात आज हलक्या सरींची शक्यता पुणे : राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली...
पशुचिकित्सा व्यवसायींचा राज्यभर बेमुदत...नगर : पशुचिकित्सा व्यवसायी (डिप्लोमा, पदविकाधारक...
ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये सर्वसाधारण पावसाची...पुणे : हवामान विभागाने ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचा...
पीकविमाधारकांना मिळणार २५ टक्के तात्काळ...पुणेः राज्यात प्रतिकूल परिस्थितीमुळे खरीप...
खोटे बोलण्यासाठी नाही, प्रामाणिक...भिलवडी, जि. सांगली : ‘‘मी तत्काळ मदतीबाबत विचार...
'रेडग्लोब’ द्राक्षवाणात मिळवली ओळखपुणे जिल्ह्यातील खोडद येथील सुहास थोरात यांनी...
उत्पन्नाच्या विविध स्त्रोतांमधून मिळवली...बोरगाव खुर्द (ता.. जि.. अकोला) येथील महेश वानखडे...
शेतकऱ्यांनी वापरले ६५० कोटींचे घरचे...पुणेः राज्यात यंदा सोयाबीनच्या पेऱ्यात मोठी वाढ...
कोकणात हलक्या पावसाची शक्यता पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र...
अडीच लाख शेतकऱ्यांच्या जमिनी सावकाराकडे...अमरावती : राष्ट्रीय व खासगी बँकांनी हात आखडता...
धरणक्षेत्रात पावसाची हजेरी पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पावसाचा...
सर्वदूर हलक्या पावसाची शक्यता पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राच्या...
पीक विम्यात कुचराई केल्यास नोटिसा काढा...नाशिक: पीकविमा योजनांची संबंधित कंपन्यांच्या...
मत्स्यबीज केंद्रामुळे महिला झाल्या...भिगवण (जि. पुणे) येथील पाच उपक्रमशील महिलांनी...
गणपतराव देशमुख यांच्या पार्थिवावर...सोलापूर ः शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि...
चीनची खत निर्यातीवर बंदी बीजिंग ः चीनमध्ये खतांचे घटलेले उत्पादन, विजेच्या...
राज्याची पीकपेरा नोंद आता शेतकरीच करणार पुणेः सातबारा उतारावरील पीकपेऱ्याची नोंद आता...
निसर्गदूतांच्या सहयोगाने ‘झाडांची भिशी...सोलापुरातील उपक्रमशील डॅाक्टर, इंजिनिअर्स,...
खानदेशात मका पिकात अमेरिकन लष्करी अळीचा...जळगाव : खानदेशात मका पिकाची लागवड यंदा बऱ्यापैकी...
पंधरा दिवस पावसाचा जोर कमी राहणार पुणे : गेल्या पंधरा दिवस कोकण आणि घाटमाथ्यावर...