सीताफळ उत्पादकांनी जाणले प्रगत लागवड तंत्रज्ञान

‘सीताफळाचे उत्पादन, संधी व प्रक्रियेनंतर मूल्यवर्धनाच्या संधी’ या विषयी सूताफळ उत्पादकांना ज्ञान मिळण्यासाठी ही कार्यशाळा झाली. त्यात म्हैसूर येथील एक दिवसाचे प्रक्रिया प्रशिक्षण महत्त्वाचे राहिले. यामधून सीताफळ उत्पादकांना ज्ञान, तंत्रज्ञानाबरोबरच ऊर्जाही मिळाली. - श्‍याम गट्‌टाणी, अध्यक्ष, सीताफळ महासंघ
सीताफळ उत्पादकांनी जाणले प्रगत लागवड तंत्रज्ञान
सीताफळ उत्पादकांनी जाणले प्रगत लागवड तंत्रज्ञान

औरंगाबाद : ‘‘राज्यासह मध्य प्रदेश व छत्तीसगडमधील सीताफळ उत्पादकांनी बंगलोर व म्हैसूर येथे सीताफळ लागवडीतील प्रगत तंत्रज्ञान जाणून घेतले. भारतीय कृषी अनुसंधान परिषद, भारतीय फलोत्पादन अनुसंधान केंद्रातर्फे प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते,’’ अशी माहिती सीताफळ महासंघाचे अध्यक्ष श्‍याम गट्टाणी यांनी दिली. 

गट्टाणी म्हणाले, ‘‘सीताफळ लागवडीतील प्रगत तंत्रज्ञानाविषयीची दोनदिवसीय कार्यशाळा ३० व ३१ ऑगस्ट रोजी बंगळूर येथे झाली. या कार्यशाळेत राज्यासह, मध्य प्रदेश व छत्तीसगडमधील ५५ सीताफळ उत्पादकांनी सहभाग नोंदविला. त्यामध्ये ४२ सीताफळ उत्पादक राज्यातील होते. महासंघाचे सचिव अनिल बोंडे, उपाध्यक्ष एकनाथ आगे, ॲग्रोव्हिजन गटशेती संघाचे प्रमुख संजय मोरे पाटील आदींचा त्यात समावेश होता.’’ 

‘‘पहिल्या चर्चासत्रात समूह चर्चेत डॉ. टी. सक्‍तीवेल, डॉ. जे. सतीश, डॉ. बी. आय. मंजूनाथ आदी तज्ज्ञांनी सहभाग नोंदविला. माती, हवामान बदल, सीताफळाच्या विविध जाती आदींविषयी यामध्ये चर्चा झाली. दुसऱ्या सत्रात फुलधारणा ते फळधारणा याविषयी संवाद झाला. दोन झाडांमधील अंतर, लागवडीचे साधन, अन्नद्रव्यांची गरज आदींवर डॉ. रेजू एम कुरियन,  डॉ. पी. सी. त्रिपाठी, डॉ. बी. रघुपती यांनी मार्गदर्शन केले,’’ असे गट्टाणी म्हणाले. 

दुसऱ्या दिवशी सीताफळ उत्पादकांनी नर्सरीला भेट दिली. प्रक्रिया व सीताफळ विक्री व्यवस्थापनाविषयीच्या चर्चासत्रात डॉ. आय. एन. डी. गौडा, डॉ. गजानना, राजेश कुमार ओझा आदींनी मार्गदर्शन केले. म्हैसूर येथील सेंट्रल फूड टेक्‍नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट या आशिया खंडातील एकमेव संशोधन संस्थेत मध्य प्रदेश, छत्तीसगड व राज्यातील २२ सीताफळ उत्पादनानंतर प्रक्रिया करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. त्यामध्ये १६ सीताफळ उत्पादक राज्यातील होते, असे गट्टाणी यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com