agriculture news in marathi Peanut incoming in Nashik, rates stable | Agrowon

नाशिकमध्ये वाटाण्याची आवक, दर स्थिर

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 31 ऑगस्ट 2021

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वाटाण्याची आवक गत सप्ताहात १९० क्विंटल झाली. आवक सर्वसाधारण होत असल्याने दर स्थिर आहेत.

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वाटाण्याची आवक गत सप्ताहात १९० क्विंटल झाली. आवक सर्वसाधारण होत असल्याने दर स्थिर आहेत. त्यास प्रतिक्विंटल ६००० ते ७५०० दर मिळाला. तर सरासरी दर ७००० राहिला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

उन्हाळ कांद्याची आवक १३२९८ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ४१० ते १७०१, तर सरासरी दर १२५० रुपये राहिला. बटाट्याची आवक ६७४६ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ४०० ते १४००, तर सरासरी दर ८१० रुपये राहिला. लसणाची आवक १५७ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ३००० ते ७५००, तर सरासरी दर ५५०० रुपये राहिला. आल्याची आवक ६६० क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ३००० ते ४०००, तर सरासरी दर ३५००रुपये राहिला.

फळभाज्यांची आवक जास्त होत असल्याने दरात घसरण झाली आहे. तर काहींचे बाजारभाव टिकून आहेत. वालपापडी-घेवड्याची आवक ७७३८ क्विंटल झाली. वालपापडीला प्रतिक्विंटल १५०० ते २०००, तर सरासरी दर १८०० रुपये राहिला. घेवड्याला प्रतिक्विंटल १००० ते १५०० तर सरासरी दर १२७० रुपये राहिला. हिरव्या मिरचीची आवक १०५८ क्विंटल झाली. मिरचीला प्रतिक्विंटल१५०० ते १८००, तर सरासरी १६०० दर राहिला. गाजराची आवक ३९ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २५०० ते ३०००, तर सरासरी दर २८०० रुपये राहिला.

फळभाज्यांमध्ये प्रति २० किलोच्या क्रेटला टोमॅटोला३० ते १५०, तर सरासरी ८० रुपये दर मिळाले. वांग्यांची १०० ते २५०, तर सरासरी १८० व फ्लॉवर ८० ते १९० सरासरी १३० रुपये असे दर प्रति १४ किलोस मिळाले. कोबीला ४० ते ६० तर सरासरी ५० रुपये असे दर प्रति २० किलोस मिळाले. ढोबळी मिरचीला ५० ते १२० तर सरासरी दर ९० रुपये असे दर प्रति ९ किलोस मिळाले.

वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये भोपळा १०० ते २५०, तर सरासरी १७०, कारले ७० ते १३० तर सरासरी १००, गिलके १५० ते ३०० तर सरासरी २३० व दोडक्याला १२० ते ३५०, तर सरासरी दर २५० रुपये असे प्रति १२ किलोस दर मिळाले. काकडीला  २०० ते ४००, तर सरासरी ३०० रुपये असे २० किलोस दर मिळाले.


इतर बाजारभाव बातम्या
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची आवक, दर...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
सोलापुरात कोथिंबीर, मेथीचे दर पुन्हा...सोलापूर ः  सोलापूर कृषी उत्पन्न बाजार...
नगरमध्ये वांगी, घोसाळ्यासह मेथी,...नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...
पुण्यात भाजीपाल्यांच्या दरात वाढ पुणे : गुलेटकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
राज्यात कोथिंबिरीच्या दरात तेजी कायमनाशिकात क्विंटलला ७००० ते १८१०० रुपये नाशिक :...
नगरला दोडका, भेंडीच्या दरात सुधारणानगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्‍पन्न...
खानदेशात केळीला ११८० रुपये दरजळगाव ः खानदेशात केळीचे दर कमी अधिक होत आहेत....
औरंगाबादमध्ये कोबी, वांगी, आले दर स्थिरऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
नाशिकमध्ये घेवड्याच्या आवकेत वाढ; दर...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुण्यात भाजीपाल्याचे दर तेजीत पुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
राज्यात टोमॅटो ५०० ते ५००० रुपये क्विंटलनांदेडमध्ये क्विंटलला ३००० ते ५००० रुपये...
झेंडू, शेवंतीच्या फुलांना पुण्यात मागणी...पुणे ः फुलांना विशेष मागणी असणारा दसरा सण अवघ्या...
गूळ सौदे बंदचे विघ्न कोल्हापुरात कायमकोल्हापूर : गुळाच्या बॉक्सचे वजन सौद्यात धरले...
नाशिकमध्ये उन्हाळ कांद्याची मागणी...नाशिक: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
सोलापुरात हिरव्या मिरची, काकडीला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात रताळे, गुळाची आवक सुरुकोल्हापूर : येथील बाजार समितीत नवरात्रीच्या...
पुण्यात टोमॅटो, वांगी, शेवगा तेजीत पुणे : गुलेटकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
राज्यात मोसंबी ८०० ते ४६०० रुपये...औरंगाबादमध्ये क्विंटलला १२०० ते ३००० रुपये...
नाशिकमध्ये लवंगी मिरची सरासरी २१५०नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
तूर दरात ५० ते १०० रुपयांची सुधारणापुणे : मागणी वाढल्याने देशभरातील बाजार...