नाशिकमध्ये वाटाण्याची आवक कमीच; दरात सुधारणा

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वाटाण्याची आवक ३०४ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १४००० ते १६००० दर मिळाला.
 Peanut inflow in Nashik is low; Rate improvement
Peanut inflow in Nashik is low; Rate improvement

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वाटाण्याची आवक ३०४ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १४००० ते १६००० दर मिळाला. सप्ताहात आवक कमी असून दरात सुधारणा झाली, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

चालू सप्ताहामध्ये उन्हाळ कांद्याची आवक घटल्याचे दिसून आले. आवक ९५०५ क्विंटल झाली. दर प्रतिक्विंटल ५०० ते २८०० होते. आवक कमी झाल्याने दर स्थिर राहिले. बटाट्याची आवक ४३३२ क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटल २१५० ते २८५० दर होते. लसणाची आवक ३०१ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ७००० ते ११००० दर मिळाला.

आद्रकची आवक २९४ क्विंटल झाली. त्यास ७०००ते ११००० प्रतिक्विंटल दर मिळाला. सप्ताहात काही फळभाज्यांची आवक कमी, तर काहींची आवक जास्त झाली. त्यानुसार दर सुद्धा कमी जास्त निघाले. वालपापडी घेवड्याची आवक ४११९ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल २५०० ते ५००० दर मिळाला, तर घेवड्याला ४०००  ते ६८०० प्रतिक्विंटल दर मिळाला. हिरव्या मिरचीची आवक २६९ क्विंटल झाली. मागणी सर्वसाधारण दर स्थिर होते. लवंगी मिरचीला ४००० ते ५५०० प्रतिक्विंटल, तर ज्वाला मिरचीला ३००० ते ३५०० प्रतिक्विंटल दर मिळाला.

फळभाज्यांमध्ये टोमॅटोला ३०० ते ७५०, वांगी १५० ते ४५०,  फ्लॉवर ६० ते २७५ असे प्रति १४ किलोस दर मिळाले. तर कोबी ५० ते २६० असा प्रति २० किलोस दर मिळाला . ढोबळी मिरची २५० ते ४०० असा प्रति ९ किलोस दर मिळाला. भोपळा २५० ते ३५०,  कारले २०० ते ३५०, गिलके ३०० ते ५००, काकडीला ३०० ते ५००,  दोडका ५०० ते ७५० असे प्रति २० किलोस दर मिळाले. 

केळी ४०० ते १००० रूपये

फळांमध्ये केळीची आवक ३८० क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल ४०० ते १००० दर मिळाला. डाळिंबांची आवक ९२५३ क्विंटल झाली. आरक्ता वाणास प्रतिक्विंटल ३००० ते ५००० व मृदुला वाणास ३००० ते १०००० प्रतिक्विंटल दर मिळाला. पपईची आवक १८९ क्विंटल झाली. तिला ८०० ते १८०० प्रतिक्विंटल दर मिळाला. शहाळ्यांची आवक ६७३ क्विंटल झाली. त्यास २६०० ते ३३०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. मोसंबीची आवक ६४९ क्विंटल झाली. त्यास १५०० ते ३००० प्रतिक्विंटल दर मिळाला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com