Agriculture news in marathi, Peanuts, oranges, pomegranate prices remained stable | Agrowon

सीताफळ, मोसंबी, संत्रा, डाळिंबाचे दर स्थिर

संतोष मुंढे
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवडाभरात सीताफळ, मोसंबी, संत्रा आदी फळपिकांच्या आवकेत चढउतार पाहायला मिळाला. या फळांचे दर जवळपास स्थिर होते. दुसरीकडे डाळिंबाच्या आवक व दरात चढउतार पाहायला मिळाले.  

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवडाभरात सीताफळ, मोसंबी, संत्रा आदी फळपिकांच्या आवकेत चढउतार पाहायला मिळाला. या फळांचे दर जवळपास स्थिर होते. दुसरीकडे डाळिंबाच्या आवक व दरात चढउतार पाहायला मिळाले.  

औरंगाबाद बाजार समितीमध्ये २८ ऑक्‍टोबरला २८ क्‍विंटल आवक झालेल्या सीताफळाला १५०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ३ क्‍विंटल आवक झालेल्या मोसंबीला ३००० ते ५५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. संत्र्यांची आवक झाली नाही. १३ क्‍विंटल आवक झालेल्या डाळिंबाला १००० ते ५२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २९ ऑक्‍टोबरला सीताफळांची ४६ क्‍विंटल आवक झाली. दर १५०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ५ क्‍विंटल आवक झालेल्या मोसंबीला ३००० ते ५५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. 

डाळिंबांची आवक ४३ क्‍विंटल, तर दर ३०० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ३० ऑक्‍टोबरला २३ क्‍विंटल आवक झालेल्या सीताफळाचे दर १५०० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ३ क्‍विंटल आवक झालेल्या मोसंबीला २००० ते ६५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. डाळिंबाची २८ क्‍विंटल आवक झाली. त्यांना ४०० ते ३२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ३१ ऑक्‍टोबरला ३३ क्‍विंटल आवक झालेल्या सीताफळाला १५०० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. मोसंबीची आवक १३ क्‍विंटल, तर दर  २५०० ते ५५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. १२ क्‍विंटल आवक झालेल्या संत्र्याचे दर १६०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. डाळिंबांची २० क्‍विंटल आवक झाली. त्यांना ३०० ते ६८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. 

सीताफळाची २ नोव्हेंबर रोजी ३४ क्‍विंटल आवक झाली. त्यांना १००० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. मोसंबीची आवक ४ क्विंटल, तर दर ३००० ते ६००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २० क्‍विंटल आवक झालेल्या संत्र्याला १५०० ते ४२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २८ क्‍विंटल आवक झालेल्या डाळिंबाचे दर ७०० ते ७००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ४ नोव्हेंबरला ५१ क्‍विंटल आवक झालेल्या सीताफळाचे दर १२०० ते ३६०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १३ क्‍विंटल आवक झालेल्या मोसंबीला ३०० ते ६००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.

संत्र्यांची आवक २५ क्‍विंटल, तर दर १५०० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ३५ क्‍विंटल आवक झालेल्या डाळिंबाला ३०० ते ७००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.


इतर बाजारभाव बातम्या
औरंगाबादमध्ये बटाटा १००० ते १८०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
भेंडीची तोडणी सूरू, पुरवठाही वाढला..(...नाशिक : बागायती भागातून वाढलेला पुरवठा आणि...
कोल्हापुरात फळांची आवक घटलेलीचकोल्हापूर : बाजार समितीचे व्यवहार पूर्ववत सुरू...
खानदेशात मका, गव्हाच्या दरात सुधारणा जळगाव : खानदेशात मका व गव्हाच्या दरात सुधारणा होत...
पुरवठा साखळी प्रभावित झाल्याने...सातारा  ः ‘कोरोना’चा संसर्ग टाळण्यासाठी सुरू...
खानदेशात कडब्याचे दर दबावात जळगाव  ः खानदेशात ज्वारी, मका, बाजरीच्या...
राहुरीत कांदा लिलाव सुरु, पण आवक, दर...राहुरी, जि. नगर : लॉकडाउनमुळे तब्बल दोन...
खानदेशात शिवार खरेदीत मक्याला १३००...जळगाव : खानदेशातील बाजारांत या आठवड्यात मक्‍याची...
अमरावती महापालिका हद्दीत ‘फार्म टू होम...अमरावती ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...
तासगावला बेदाण्याचे सौदे प्रायोगिक...सांगली ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर २२ मार्च पासून...
औरंगाबादमध्ये ज्वारी १८०० ते २०२५ रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
लातूर जिल्ह्यात १२ केंद्रांवर १ लाख २१...लातूर : जिल्ह्यातील १२ खरेदी केंद्रांवरून...
मुंबई बाजार समितीत भाजीपाल्याची आवक...मुंबई : मुंबई बाजार समितीत कोरोनाग्रस्त...
रत्नागिरी बाजार समितीत आंब्याची अडीच...रत्नागिरी ः कोरोनाविषयक संचारबंदीमुळे अडचणीत...
औरंगाबाधमध्ये हिरवी मिरची १००० ते १६००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
औरंगाबादमध्ये मोसंबी ६०० ते १२०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
केळी दरात सुधारणा, परराज्यात पाठवणी...जळगाव ः केळी दरात मागील दोन-तीन दिवसांत चांगली...
नांदेड बाजार समितीत नवीन हळदीची आवक नांदेड : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
रत्नागिरी बाजार समितीत उद्यापासून आंबा...रत्नागिरी ः आंबा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी...
सांगलीत हळद, गूळाचे सौदे लांबणीवरसांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळद...