agriculture news in marathi Peanuts in the summer season Planted by token method | Page 3 ||| Agrowon

केहाळ येथे भुईमुगाची उन्हाळी हंगामात टोकन पद्धतीने लागवड

टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 एप्रिल 2021

परभणी ः जिल्ह्यातील केहाळ (ता. जिंतूर) येथील कृषिभूषण मधुकर घुगे यांनी यंदाच्या उन्हाळी हंगामात टोकन पद्धतीने भुईमुगाची लागवड केली आहे.

परभणी ः जिल्ह्यातील केहाळ (ता. जिंतूर) येथील कृषिभूषण मधुकर घुगे यांनी यंदाच्या उन्हाळी हंगामात टोकन पद्धतीने भुईमुगाची लागवड केली आहे. त्याची पाहणी कृषी विभागातील अधिकारी, कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी नुकतीच केली.

सिंचनासाठी पाणी उपलब्ध असल्यामुळे यंदा जिंतूर तालुक्यातील उन्हाळी भुईमूग पिकाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तालुक्यात भुईमुगाचे सर्वसाधारण क्षेत्र २७० हेक्टर आहे. त्या तुलनेत या वर्षी ३ हजार २६४ हेक्टर क्षेत्रावर (१२०८ टक्के) पिकाची पेरणी झाली आहे.

घुगे हे गेल्या २० वर्षांपासून त्यांचे बंधू पद्माकर घुगे यांच्या मदतीने भुईमुगाच्या विविध वाणांचे बिजोत्पादन घेतात. यंदा त्यांनी एकूण २१ एकर क्षेत्रावर भुईमुगाच्या टी.जी. ५१, टी.जी. ३७A, टी. एल.जी. ४५ या सुधारित वाणांची टोकण पद्धतीने लागवड केली.

शुक्रवारी (ता. १६) जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतील विस्तार कृषीविद्यावेत्ता डॉ. यू. एन. आळसे, तालुका कृषी अधिकारी एस. पी. काळे, मंडळ कृषी अधिकारी किशोर शेळके, कृष्णदेव थिटे, कृषी सहायक हरि तोरणे यांनी भुईमूग पिकाची पाहणी केली. या वेळी घुगे यांनी प्रयोगाबाबत माहिती दिली. 
 


इतर ताज्या घडामोडी
शिरोळमधील ३७ हजार कुटुंबांना...जयसिंगपूर, जि. कोल्हापूर : संभाव्य पुराच्या...
सौरउर्जेद्वारे २५ हजार मेगावॅट ...औरंगाबाद : राज्यात यापुढे नवीन औष्णिक प्रकल्प...
पीककर्ज देणार नसाल तर किडनी विक्रीची...अकोला : गेला हंगाम सुरळीत न गेल्याने अनेक...
भरड धान्याची हमीभावाने खरेदी सुरू ः...नाशिक : ‘‘पणन हंगाम २०२०-२१ रब्बीसाठी गहू व...
माजलगाव तालुक्यात मशागत आटोपली;...माजलगाव, जि. बीड : मागील दोन वर्षांपासून परतीच्या...
शेतकऱ्यांच्या मदतीला सदैव तत्पर राहा ः...नांदेड : ‘‘शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या...
जालना जिल्ह्यात मक्याचे पस्तीस हजार...जालना : ‘‘जिल्ह्यात पाच केंद्रांत मक्याची किमान...
खानदेशात वादळामुळे झालेल्या २५ टक्के...जळगाव : खानदेशात पूर्वमोसमी पाऊस व वादळाने मे...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची...परभणी / हिंगोली : कोरोनामुक्त गाव या स्पर्धेच्या...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीची १७ केंद्रांत...जळगाव : जिल्ह्यात १७ केंद्रांमध्ये मका, ज्वारी व...
शेती तंत्रासाठी ई-पॉकेट बुक उपयोगीसोलापूर ः कृषी क्षेत्रात तरुणांना आधुनिक शेती...
कृषी कायद्यात करणार सुधारणा ः...मुंबई ः केंद्र सरकारने लागू केलेले तीन कृषी कायदे...
इंधन दरवाढप्रश्‍नी काँग्रेसचे राज्यभर...नागपूर ः पेट्रोल आणि डिझेलच्या सातत्याने होणाऱ्या...
पुण्यात भेंडी, गवारीच्या दरात सुधारणापुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी...
मॉन्सूनची कर्नाटकपर्यंत मजलपुणे : नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) केरळात दाखल...
बियाणेनिर्मितीसाठी नवी कार्यपद्धती लागूपुणे ः राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी...
केळी निर्यातीसाठी आता ‘बनाना नेट’पुणे ः द्राक्ष, डाळिंब, आंबा, भाजीपाला,...
दूधदरप्रश्‍नी लढा उभारणार ः अजित नवलेनगर ः कोरोनामुळे लॉकडाउन झाल्याने दुधाची मागणी...
कृषी प्रक्रिया संचालनालयाची निर्मिती...मुंबई : राज्यामध्ये कृषी प्रक्रिया व मालाची...
विमा कंपन्यांशी मंत्र्यांचे साटेलोटे ः...नागपूर : पीकविमा कंपन्यांच्या विरोधात यापूर्वी...