Agriculture news in marathi peas 2000 to 2500 rupees per quintal in Aurangabad | Agrowon

औरंगाबादमध्ये वाटाणा २००० ते २५०० प्रतिक्विंटल

टीम अॅग्रोवन
रविवार, 22 डिसेंबर 2019

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. २१) वाटाण्याची ९१ क्‍विंटल आवक झाली. त्यास २००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. २१) वाटाण्याची ९१ क्‍विंटल आवक झाली. त्यास २००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी हिरव्या मिरचीची ८५ क्‍विंटल आवक झाली. तिला १००० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ३४९ क्‍विंटल आवक झालेल्या कांद्याचा दर  २२०० ते ७००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ५७ आवक झालेल्या फ्लॉवरचा दर २००० ते २८०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ९७ क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोला ५०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. वांग्यांची आवक ५३ क्‍विंटल, तर दर ६०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ४ क्‍विंटल आवक झालेल्या गवारीला ३००० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. 

काकडीची आवक १७ क्‍विंटल, तर दर ६०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ९ क्‍विंटल आवक झालेल्या भेंडीला २००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. कोबीची आवक ८३ क्‍विंटल, तर दर ६०० ते ७०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ९ क्‍विंटल आवक झालेल्या लिंबांला ५०० ते ७०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १८ क्‍विंटल आवक झालेल्या दुधी भोपळ्याला ४०० ते ६०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ढोबळ्या मिरचीची आवक २० क्‍विंटल, तर दर १००० ते १८०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. 

४२ क्‍विंटल आवक झालेल्या गाजराचा दर १५०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ७ क्‍विंटल आवक झालेल्या वालशेंगांना ६०० ते ८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. कारल्याची आवक ८ क्‍विंटल, तर दर १५०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १५ क्‍विंटल आवक झालेल्या मक्याला ५०० ते ७०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १७ क्‍विंटल आवक झालेल्या मोसंबीला १५०० ते ५५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. डाळिंबाची आवक ९० क्‍विंटल, तर दर २५० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. 

२५ क्‍विंटल आवक झालेल्या अंजिराचे दर २५०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ३० क्‍विंटल आवक झालेल्या बोरांचे दर ६०० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ७ क्‍विंटल आवक झालेल्या संत्र्याला १००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. पेरूची आवक २८ क्‍विंटल, तर दर १००० ते २२०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. २५ क्‍विंटल आवक झालेल्या पपईला ७०० ते ९०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. बटाट्याची आवक ९०० क्‍विंटल, तर दर १७०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ऍपल बोरांची आवक २० क्‍विंटल, तर दर १००० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. 

२०० क्‍विंटल आवक झालेल्या सफरचंदाचे दर ३५०० ते ८५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २९ हजार जुड्यांची आवक झालेल्या मेथीला ५० ते १५० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला. पालकाची आवक १८ हजार जुड्या, तर दर ९० ते १३० रुपये प्रतिशेकडा राहिले. २३ हजार जुड्यांची आवक झालेल्या कोथिंबिरीला १०० ते १५० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

ताज्या बाजार भावासाठी क्लिक करा


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात कांदा लागवड १४ हजार हेक्‍टरवरजळगाव  ः खानदेशात रब्बी हंगामातील कांदा...
‘कर्जमुक्ती योजनेसाठी येणाऱ्या...अकोला  ः  महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
द्राक्षपट्ट्यासह आदिवासी भागात खुलली...नाशिक  : स्ट्रॉबेरी लागवडीसाठी महाबळेश्वरची...
सांगलीत हळदीच्या उत्पादनात घटसांगली : जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात आलेला महापूर...
चांद्यात फ्लॉवरच्या निकृष्ट...नगर : तेलंगण राज्यातील एका बियाणे कंपनीचे...
'थेट जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय कायम...सोलापूर  ः राज्य सरकारने थेट जनतेतून सरपंच...
औरंगाबाद जिल्ह्यातील टंचाई...औरंगाबाद : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईचे...
लातूर विभागातील दोन हजार हेक्टरवर फळबाग...नांदेड : कृषीच्या लातूर विभागांतर्गतच्या परभणी,...
अकोला बाजार समितीचे गरजूंना पाठबळअकोला ः कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढाकाराने...
उशिराच्या गव्हाला वाढत्या तापमानाचा...जळगाव  ः खानदेशात गहू पिकाची स्थिती...
पपई दरांचा नंदुरबारात पुन्हा तिढाशहादा, जि. नंदुरबार  : सध्या मंदी असल्याने...
पीकविमा भरपाई न मिळाल्यास तीव्र आंदोलन...अमरावती  ः जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामात...
गडचिरोली : 'आयसीएआर'ची काजू पीक...गडचिरोली  ः भात उत्पादक पूर्व विदर्भात...
ऐन फेब्रुवारीतच उन्हाळ्याच्या झळा पुणे : राज्यात कमाल तापमानात मोठी वाढ झाल्याने...
वनबंधू योजना सुरू करण्यासाठी केंद्राकडे...नाशिक : आदिवासी विभागाच्या वनबंधू योजनेअंतर्गत १४...
मराठवाड्यातील रेशीम प्रकल्पाला ग्रीन...औरंगाबाद : झपाट्याने विस्तारत असलेल्या रेशीम...
`गोवर-रुबेला'त सोलापूर जिल्ह्यात...सोलापूर : केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘गोवर-...
सांगली जिल्ह्यात शेत, पाणंद रस्त्यांचे...लेंगरे, जि. सांगली : शेत आणि पाणंद रस्त्यांचे...
पाणीवाटप संस्थेद्वारे मिळणार ‘ताकारी’चे...सांगली : ताकारी उपसा सिंचन योजनेच्या लाभ...
मका संशोधन केंद्राचे भिजत घोंगडेऔरंगाबाद : कार्यकारी परिषदेच्या ठरावानंतर...