Agriculture news in marathi peas 2000 to 3000 rupees per qintal in Parbhani | Agrowon

परभणीत वाटाण्याला २००० ते ३००० रुपये

टीम ॲग्रोवन
शनिवार, 11 जानेवारी 2020

परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. १०) वाटण्याची १२५ क्विंटल आवक झाली. त्याला प्रतिक्विंटलला २००० ते ३००० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. १०) वाटण्याची १२५ क्विंटल आवक झाली. त्याला प्रतिक्विंटलला २००० ते ३००० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

पालेभाज्यांमध्ये मेथीच्या ४० हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकड्याला २०० ते २५० रुपये दर मिळाले. पालकाची २० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ५०० ते १००० रुपये दर मिळाले. शेपूची २० क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटलला ८०० ते १५०० रुपये  मिळाले. चुक्याची ६ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १२०० ते २००० रुपये दर मिळाले. कोथिंबिरीची ९० क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटलला ५०० ते १००० रुपये दर मिळाले. वेलवर्गीय भाज्यांमध्ये दोडक्याची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ३५०० ते ५००० रुपये दर मिळाले.

कारल्याची १० क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटलला २००० ते २५०० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची १५ क्विंटलला आवक होऊन प्रतिक्विंटलला ५०० ते १००० रुपये दर मिळाले. काकडीची ५० क्विंटल आवक झाली. दर ७०० ते १००० रुपये मिळाले. शेंगवर्गीय भाज्यांमध्ये गवारीची ५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ४००० ते ६००० रुपये दर मिळाले.

चवळीची ५ क्विंटल आवक झाली. दर ३००० ते ४००० रुपये मिळाले. वालाची १० क्विंटल आवक झाली. दर २००० ते २५०० रुपये मिळाले. पातीच्या कांद्याची १० क्विंटल, तर दर १५०० ते २५०० रुपये दर मिळाले. वांग्यांची ४५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १२०० ते २००० रुपये दर मिळाले. 

ढोबळ्या मिरचीला २००० ते २५०० रुपये

ढोबळ्या मिरचीची ८ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २००० ते २५०० रुपये दर मिळाले.फ्लॅावर ची ४० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १२०० ते २००० रुपये दर मिळाले. कोबीची ५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १२०० ते २००० रुपये मिळाले. भेंडीची १२ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २५०० ते ३५०० रुपये दर मिळाले. लिंबांची २५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ४०० ते ८०० रुपये दर मिळाले. बीट रूटची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १२०० ते २००० रुपये दर मिळाले. गाजराची ३०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ७०० ते १५०० रुपये दर मिळाले.

ताज्या बाजार भावासाठी क्लिक करा


इतर बाजारभाव बातम्या
सेनगाव, माकोडी कृषी बाजारात शेतमालाची...हिंगोली : ‘‘सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समिती,...
मुंबईत हापूसची आवक वाढली; ५ डझन पेटीस...मुंबई : वाहतुकीतील अडथळे दूर केल्याने मुंबई कृषी...
पुणे बाजार समितीत भाजीपाल्याची ९ हजार...पुणे ः ‘कोरोना’ लॉकडाऊनमध्ये बाजार समितीमधील...
औरंगाबाद बाजार समितीत मिरचीची १३०...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
मुंबई बाजार समितीत फळांची आवक वाढली मुंबई : जीवनावश्यक वस्तूंचा योग्य पुरवठा व्हावा,...
सोलापुरात ५०० गाड्या कांद्याची आवक,...सोलापूर : कोरोना विषाणूमुळे सोलापूर बाजार...
जळगाव जिल्ह्यात केळीचे दर ३०० ते ४००...जळगाव : जिल्ह्यातील केळी उत्तर भारतात...
पुणे बाजार समितीत १० हजार क्विंटल...पुणे : लॉकडाऊमध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाला उठाव...
लासलगाव बाजार समितीचे कामकाज पुन्हा बंद नाशिक : ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे लासलगाव...
पुण्यात पोलिस बंदोबस्तात बाजार समिती...पुणे : कोरोनामुळे शहरात लॉकडाऊन असतानाही...
खानदेशातील बाजार समित्यांत आवक सुरळीतजळगाव : खानदेशातील धुळे, जळगाव, नंदुरबार येथील...
सोलापुरात बाजार समितीत भाजीपाला...सोलापूर ः कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यभर...
कोल्हापूरमध्ये ‘कोरोना’चा...कोल्हापूर : कोरोनाच्या धसक्‍याने या सप्ताहात...
नागपुरात संत्रादरातील सुधारणा कायमनागपूर ः कोरोनामुळे ‘व्हिटॅमिन सी’ असलेल्या...
पुण्यात भाजीपाल्याच्या दरात २५ ते ३०...पुणे : ‘‘कोरोना विषाणूचा फैलाव आणि प्रादुर्भाव...
औरंगाबादमध्ये संत्रा ५०० ते १००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत फ्लॉवर ४०० ते ८०० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्‍यात संत्रा ५०० ते ४००० रुपये...औरंगाबादमध्ये प्रतिक्विंटल ६०० ते १६०० रुपये...
सोलापुरात मेथी, कोथिंबिरीच्या दरात...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
हरभरा दर दबावातजळगाव ः खानदेशात यंदा हरभऱ्याचे विक्रमी उत्पादन...